• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट !

ByMirror

Jan 27, 2026
चौथ्या टप्प्याची रविवारी चाचणी यशस्वी

चौथ्या टप्प्याची रविवारी चाचणी यशस्वी


नगर -दौंड डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पा अंतर्गत दौंडकाष्टी


सिंगल लाईनचा अडसर संपणार; नगर-दौंड डबल लाईनमुळे रेल्वे वेगवान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर -दौंड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत दौंडकाष्टी 13 कि.मी. अंतराची चाचणी रविवारी (दि 25) रोजी घेण्यात आली लवकरच नगर ते दौड पर्यंतचे हे काम पूर्ण होणार असून यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या पूर्ण मार्गात इलेक्ट्रिक इंजीनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षापासून नगर ते दौड द्रुतगती (डबललाईन) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. या पुर्वी नगर ते मनमाड 12 टप्पाची चाचणी घेण्यात आली.नगर ते मनमाड मधील 184 कि .मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली.


मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्त्वपूर्ण टप्पा येतो. मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडी चा वेग कमी होता. तसेच सिंगल लाईन मुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. त्यामुळे तासोनतास रेल्वे गाडी एकाच जाग्यावर थांबुन ठेवावी लागत. मात्र आता हा पूर्ण मार्ग डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाडयांचा थांबा आता बंद होणार आहे. तसेच या कामामुळे रेल्वे ताशी 120 प्रति किमी वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे. तीन वर्षापासून हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पूर्ण होणार आहे. रविवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते दौड पर्यतंचा टप्पा पूर्ण होण्यास अजून काही कालावधी लागू शकतो असा अंदाज उप मुख्य अभियंता सागर चौधरी (बांधकाम) यांनी सांगितले.


या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दौंड ते काष्टी द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी घेतली.
रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशासकीय अधिकारी ए. के.पांडे, मुख्य अभियंता बी. के. सिंह, उपमुख्य अभियंता सागर चौधरी,(बांधकाम),सहाय्यक कार्यकारी अभियंता राजनारायण सैनी, सिनियर सेक्शन इंजिनिअर प्रशांत कुमार, सिनियर सेक्शन इंजिनिअर अजय राणा, धर्मेंद्र कुमार, एस. के. सिंह, सुद्धांसू कुमार, आर. डी. सिंह, प्रगती पटेल, परशुराम राठौड़, धम्मरत्न संसारे आदी उपस्थित होते.


दौंडकाष्टीडबल लाईन ( द्रुतगती ) रेल्वे मार्गाच्या चवथ्या टप्प्याची चाचणी रविवारी घेण्यात आली. यात रेल्वेगाडीचा नेमका वेग काढला आहे. या महत्त्वकांक्षी कामामुळे नगरला फायदा होणार असून, नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होईल -उप मुख्य अभियंता सागर चौधरी (बांधकाम)

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *