• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरातील आंबेडकर स्मारक सामाजिक उपक्रमांसाठी तथागत बुद्धिस्ट सोसायटीला वापरास मिळावे

ByMirror

Dec 18, 2024
धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी व सामाजिक कार्यासाठीचा उद्देश

शहरातील आंबेडकरी समाजाची मागणी

धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी व सामाजिक कार्यासाठीचा उद्देश

नगर (प्रतिनिधी)- शहराच्या टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तथागत बुद्धिस्ट सोसायटीला समाज उपयोगी उपक्रम राबवण्यासाठी वापरास मिळण्याची मागणी आंबेडकरी समाजाच्या वतीने आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. समाजाच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन सध्या सुरु असलेल्या सामाजिक कार्याबद्दल माहिती देऊन सदर जागा सामाजिक कार्यासाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी करुन देण्यात आली आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी बाल भिक्खु संघ व भन्ते राहत असून, ते समाज उपयोगी काम करत आहे. तसेच शिक्षण देखील घेत आहे. महाराष्ट्रातील धम्म गुरु या स्मारकांमध्ये येतात व त्यांची या ठिकाणी व्यवस्था होते. धम्मकार्यासाठी शहरामध्ये कुठल्याही प्रकारची जागा नसून, सदर जागा समाज उपयोगासाठी वापरली जात आहे.
ही जागा वापरापूर्वी कित्येक दिवसापासून स्मारक बंद असल्याने अस्वच्छा पसरली होती. जेंव्हापासून ही जागा धम्माच्या कार्यासाठी वापरण्यास सुरुवात केली, तेंव्हापासून तेथे स्वच्छता राखली जाऊन येथील गैरप्रकार देखील थांबले आहेत. धम्माचे काम देखील या ठिकाणावरून व्यवस्थित चालते.


सदर न्यासाची नोंदणी झाल्यापासून विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा लाभ वंचित उपेक्षितांना मिळत आहे. बौद्ध धर्माच्या विकासासाठी प्रचार व प्रसारासाठी स्थापन केलेल्या न्यासाच्या अनुषंगाने गरीब कुटुंबातील दांपत्याचा विवाह लावणे, मोफत आरोग्य शिबिर, बौद्ध वधू वर सूचक मंडळ, बौद्धाचार्य तयार होण्यासाठी श्रामनेर शिबिराचे आयोजन केले जात आहे.


समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रंथालय अभ्यासिका सुरू करण्यात न्यासाचा मानस आहे. सर्व उपक्रमाचा व्यापक स्वरूप प्राप्त होण्यासाठी न्यासाला जागेची आवश्‍यकता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक गेल्या अनेक वर्षापासून मोकळ्या अवस्थेत असून, त्यात न्यासाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम सुरु आहे. या वास्तूचा विनियोग चांगल्या व योग्य उपक्रमासाठी होण्यासाठी तथागत बुद्धिस्ट सोसायटी या संस्थेला सदर जागा वापरण्यास देण्याची मागणी आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच या संदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना देखील पत्र पाठविण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *