• Thu. Mar 5th, 2026

मतदान केंद्राच्या बाहेर असणाऱ्या 100 मीटर वरील रेषेला शहीद भगतसिंग क्रांतिरेषा घोषित

ByMirror

Oct 21, 2024

भगतसिंग यांच्या बलिदानाची आठवण ठेऊन योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकी मधील प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर 100 मीटर अंतरावर चुण्याने आखलेल्या नियंत्रण रेषेला तमाम जनतेच्या वतीने पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने शहीद भगतसिंग क्रांतिरेषा घोषित केली आहे. तर प्रत्येकाने मतदान करताना भगतसिंग यांच्या बलिदानाची आठवण ठेऊन लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती असणाऱ्या उमेदवारालाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे.


शहीद भगतसिंग यांनी फाशीवर जाण्याच्या अगोदरच्या दिवशी लिहिलेल्या शेवटच्या मृत्युपत्रा, या देशातील भावी पिढीकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आणि आपल्याला अजून जगण्याची संधी मिळाली असती तर आपण देशासाठी यापेक्षा मोठी कामगिरी करून मायभूमीचे ऋण फेडले असते! असे त्यांनी मृत्युपत्रात भावना व्यक्त केलेली आहे. दुर्देवाने भगतसिंग यांना पुढे जगण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे भगतसिंग यांची अंतिम इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी या देशातील तमाम जनतेवर आली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


निवडणुकीच्या माध्यमातून चांगले उमेदवार निवडून आल्यास चांगले सरकार स्थापन करता येते. त्यातून लोककल्याणकारी कायदा आणि सत्तेची अंमलबजावणी करून घेता येते. त्यामुळे मतदान केंद्राच्या बाहेर 100 मीटर अंतरावर असलेल्या शहीद भगतसिंग रेषा ओलांडून मतदान केंद्रात मतदानासाठी जाणाऱ्या प्रत्येक मतदाराने भगतसिंग यांच्या बलिदानाची पवित्र आठवण व त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी चांगल्या उमेदवाराला मतदान करण्याचे म्हंटले आहे.


राजाकारणात पसरलेले सत्तापेंढारी, ताबामारी, टक्केवारी, खून, मारहाण आणि समाजविघातक पुढाऱ्यांच्या आहारी जाऊन आणि मतासाठी पैसे घेऊन किंवा जाती धर्माचा विचार करून चुकीच्या उमेदवाराला मतदान करतात. त्यातून जनता विकासापासून वंचित राहते. परंतु भगतसिंग यांच्या पवित्र क्रांती रेषेचे उल्लंघन यापुढे कोणालाही करता येणार नाही. त्यामुळे लोकमकात्या उमेदवारांचे विसर्जन यंदाच्या विधानसभा निवडणूकीत नक्की होऊ शकणार असल्याचा आशावाद संघटनेने व्यक्त केला आहे. या चळवळीसाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, वीरबहादुर प्रजापती, अर्शद शेख, डॉ. महेबूब सय्यद आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *