• Thu. Oct 16th, 2025

बालिकाश्रम रोड येथील त्या मजारला पोलीस संरक्षण द्यावे

ByMirror

Jan 20, 2025

लालबाग कब्रस्तान ट्रस्ट व मुस्लिम समाजाची मागणी; मजार कब्रस्तानच्या जागेत आसल्याचा खुलासा

लोकप्रतिधीने मुस्लिम समाजाच्या दर्गाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध

नगर (प्रतिनिधी)- शहरातील लोकप्रतिधीने मुस्लिम समाजाच्या दर्गाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवून, ऐतिहासिक वक्फ लालबाग कब्रस्तान मधील सय्यद सहाब यांच्या मजारला त्वरित पोलीस संरक्षण देण्याची मागणी कब्रस्तान ट्रस्ट व मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, मनपाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांची भेट घेऊन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले. तर राजकीय स्वार्थासाठी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


याप्रसंगी शेख अयुब सालर, इसाक हनीफ, मुश्‍ताक अहमद, खलील इब्राहिम, मंजूर अहमद, आबीद हुसेन, अल्ताफ शेख, कासीम इब्राहिम, शकील बिल्डर, साजिद जमीर, आसिफ रजा, नदीम युसूफ, अब्दुल कादिर, जुबेर शेख, मुश्‍ताक वस्ताद, मतीन खान, सर्फराज शेख, शाह फैसल, फारूक शेख, तन्वीर बागबान, मुजम्मील, समीर भाई आदी उपस्थित होते.


सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या नगर शहरातील बालिकाश्रम भागात ऐतिहासिक वक्फ लालबाग कब्रस्तान असून 1995 कायद्यान्वये वक्फ नोंदणीकृत संस्था आहे. 1953 सालापासून धर्मदाय आयुक्त यांच्याकडे या कब्रस्तानची नोंद आहे. येथे सय्यद साहब यांची दर्गा असून, दर्गाचे अतिक्रमण नसून कब्रस्तान मधील ही दर्गा आहे. सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले हे धार्मिक स्थळ आहे. कारण नसताना जाणून-बुजून राजकीय स्वार्थासाठी शहरातील वातावरण दूषित करण्याचा काही मंडळी प्रयत्न करीत आहे. शहरातील नागरिकांची प्रशासनाची दिशाभूल करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


सय्यद साहब यांच्या दर्गाला ताबडतोब पोलीस बंदोबस्त देवून संरक्षण द्यावे. दर्गावरुन राजकारण केले जात असताना शहरातील मुस्लिम समाजाच्या कुठल्याही प्रकारे धार्मिक भावनेला आघात होऊ नये, अशी मागणी कब्रस्तान ट्रस्ट व मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.



शहराचे लोकप्रतिनिधीने सय्यद साहब यांच्या दर्गावर आक्षेप घेऊन अतिक्रमण असल्याचे बोलत होते. सदर दर्गा कब्रस्तानच्या जागेत असून, सदर कब्रस्तान नोंदणीकृत रजिस्टर आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न स्वार्थासाठी निर्माण करून मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचे काम केले जात आहे. या संदर्भात काही अनुचित प्रकार घडल्यास मुस्लिम समाज रस्त्यावर उतरेल. -आबिद हुसेन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *