• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी

ByMirror

Oct 3, 2024
आज होणार घटस्थापना; धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

पोलीस प्रशासन व विश्‍वस्तांनी केली तयारीची पहाणी

आज होणार घटस्थापना; धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. शहरासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत असतात. नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तासाठी एमआयडीसी पोलीसांनी श्री रेणुका माता देवस्थान मंदिराची पहाणी केली.


याप्रसंगी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व देवस्थानच्या विश्‍वस्तांची बैठक पार पडली. या बैठकीत विश्‍वस्तांनी नवरात्र उत्सवानिमित्त ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासह बदोबस्तासाठी पोलीसांनी माहिती दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्‍वस्त गोरख कातोरे, राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी उपस्थित होते.


गुरुवारी (दि.3 ऑक्टोबर) सकाळी मिरवणुक काढून देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसेच ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य शिबिर, रक्तदान, होमहवन, देवीचा गोंधळ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *