किचकट व अवघड गणित विद्यार्थ्यांनी सोडवले काही मिनिटात
अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुने खारे (ता. नगर) येथील लोकहितवादी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गणितीय प्रक्रिया असलेल्या अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रसारक मंडळाचे सचिव रावसाहेब पाटील शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.डी. थोरात यांच्यासह शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
चाकोते अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. किचकट व अवघड गणित प्रक्रिया काही मिनिटामध्ये सोडवून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखविले.
यामध्ये प्रथम क्रमांक- वर्षा अजय गेरंगे (इयत्ता सहावी), द्वितीय क्रमांक- जोया सादिक सय्यद (इयत्ता सहावी), तृतीय क्रमांक- भार्गवी मिथुन बोरुडे (इयत्ता सातवी), चतुर्थ क्रमांक- सोहम सुधाकर लांडे (इयत्ता सहावी) यांनी पटकाविले. तर इयत्ता पाचमी मधील ओम विजय निमसे, समर्थ जबाजी निमसे, समर्थ बाळासाहेब निमसे, अनिकेत मच्छीन्द्र पातारे, इयत्ता सहावी मधील वैष्णवी अशोक खेसे, सिद्धी विकास निमसे, श्रावणी भारत गेरंगे, वेदांत प्रवीण ताकपेरे, इयत्ता सातवी मधील ईश्वरी संदीप दरंदले, श्रावणी सुनील लांडे यांनी यश संपादन केले. संस्थेचे सचिव रावसाहेब पाटील शेळके यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.