• Mon. Jul 21st, 2025

नॅशनल आणि इंटरनॅशनल स्मार्ट किड्स अबॅकस स्पर्धेत नगरच्या विद्यार्थ्यांचे यश

ByMirror

Jan 7, 2024

उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- तेराव्या नॅशनल आणि सहाव्या इंटरनॅशनल स्मार्ट किड्स अबॅकस स्पर्धेमध्ये शहरातील ग्रेड प्लस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. किचकट व अवघड गणित प्रक्रिया काही मिनिटामध्ये सोडवून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखविले.


पुणे येथे नुकतीच सदरची नॅशनल आणि इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रासह इतर राज्यातील 5 हजारपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये ग्रेड प्लसची विद्यार्थिनी शुभ्रा आवारे हिने फ गटात प्रथम क्रमांक तर रुद्र पटेल याने द्वितीय क्रमांक पटकवला. तर इतर विद्यार्थ्यांनी देखील विविध गटात यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांनी अवघ्या 5 मिनिटामध्ये 100 गणिते सोडवली. या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रतिक शेकटकर, शाहीन शेकटकर व मंजुश्री फल्ले यांचे मार्गदर्शन लाभले.


गुणवंत विद्यार्थ्यांचा उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. फिरोदिया यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *