• Mon. Mar 2nd, 2026

लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र दोन दिवसांच्या आत सादर करा

ByMirror

Feb 11, 2025

पारनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना आदेश

दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या व माहिती लपविणाऱ्यांच्या नोकरीवर येणार गडांतर

नगर (प्रतिनिधी)- अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या पाठपुराव्यानंतर पारनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व केंद्रप्रमुख व जिल्हा परिषद प्रशाळेतील सर्व मुख्याध्यापक यांना नागरी सेवा प्रतिज्ञापत्र नियम 2005 अन्वये लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र दोन दिवसांच्या आत सादर करण्याचे लेखी आदेश लाढले आहेत.


दोन पेक्षा अधिक अपत्य असताना देखील पारनेर तालुक्यातील शिक्षण विभाग पंचायत समिती अंतर्गत नागरी सेवा (लहान कुटुंब) प्रतिज्ञापत्र नियम 2005 अन्वये नमुना अ नियम 4 नुसार खोटी माहिती देणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांच्या प्रतिज्ञापत्राची चौकशी करुन दोषींना बडतर्फ करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. तर या मागणीसाठी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. संघटनेच्या सदर पाठपुराव्याची दखल घेऊन गटशिक्षणाधिकारी यांनी आदेश काढले आहेत.


पारनेर तालुक्यातील शिक्षण विभाग पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांची महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र नियम 2005 शासन परिपत्रक व प्रतिज्ञापत्र नमुना अ नियम 4 प्रमाणे लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र दोन दिवसांच्या आत दोन प्रतीत केंद्रनिहाय जमा करून, कार्यालयास सादर करण्याचे आदेशात म्हंटले आहे. या प्रकरणात दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या व माहिती लपविणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापकांच्या नोकरीवर गडांतर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *