• Fri. Sep 19th, 2025

भिंगारमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पेन देऊन स्वागत

ByMirror

Jun 16, 2025

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम; विद्यार्थ्यांच्या मनोबलासाठी सकारात्मक पाऊल


सक्षम समाजासाठी शिक्षणाची कास धरावी -संजय सपकाळ

नगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि.16 जून) विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा रंगला होता.


शाळेच्या आवारात आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, सचिन चोपडा, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, प्रांजली सपकाळ आदींसह शाळा समिती सदस्य रवींद्र बाकलीवाल, मुख्याध्यापिका व्ही.सी. आरण्ये, उपमुख्याध्यापक सी.डी. वादळे, पर्यवेक्षिका एम.पी. गायकवाड, उषाताई ठोकळ, रतनशेठ मेहेत्रे, दीपकराव धाडगे, ईवान सपकाळ, मनोहर दरवडे, अभिजीत सपकाळ, कोंडीराम वाघस्कर, अशोक पराते, शेषराव पालवे, अविनाश पोतदार, योगेश चौधरी, दशरथ मुंडे, किरण फुलारी, सखाराम अळकुटे यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुप हे केवळ आरोग्यासाठी नव्हे, तर सामाजिक बांधिलकीसाठीही कार्यरत आहे. दरवर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा, तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबविला जातो. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, त्या माध्यमातून सक्षम समाज घडविणे हे आपले उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


मुख्याध्यापिका व्ही.सी. आरण्ये यांनी हरदिनच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाने अशा प्रकारची साथ देणे आवश्‍यक असल्याचे नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *