• Thu. Oct 16th, 2025

वाळूंज पब्लिक स्कूलचे विद्यार्थी, पालक व शिक्षक लावणार एक हजार झाडे

ByMirror

Jul 10, 2024

शिक्षक पालक सहविचार सभेत केला संकल्प

भारत सरकारचा बेस्ट एंटरप्राइज ऑफ द इयर पुरस्कार मिळाल्याबद्दल कृषीभूषण सबाजीराव गायकवाड यांचा सन्मान

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील वाळूंज पब्लिक स्कूलच्या शिक्षक पालक सहविचार सभेत प्रत्येक पालकांना एक फळ झाड देऊन त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थी व पालक आपल्या घराच्या अंगणात दिलेले झाड लाऊन त्याचे संवर्धन करणार आहेत. सबाजीराव गायकवाड कृषी विकास प्रतिष्ठानच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त वन महोत्सव उपक्रमातंर्गत शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनाने हा उपक्रम राबविला.


वाळूंज पब्लिक स्कूल मध्ये झालेल्या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल ॲण्ड मिडीयम एनटरप्राईजेसच्या वतीने इंडिया बिजनेस अवॉर्ड अंतर्गत सबाजीराव गायकवाड कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सबाजीराव गायकवाड यांना दिल्लीत बेस्ट एंटरप्राइज ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संचालिका छायाताई गायकवाड, प्राचार्या सोनल गायकवाड, प्राथमिक मुख्यध्यापिका रुथ नायडू, कृषी विद्यालयाच्या प्राचार्या वृषाली तोडमल आदींसह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


गणेश झरेकर यांनी शाळेचा वाढता गुणवत्ता आलेख सादर करुन विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यवहारिक ज्ञानासह पर्यावरण संवर्धन व संस्कारक्षम शिक्षणाची मुल्य रुजवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक पालक सहविचार सभेत हेड बॉयपदी करण बोचरे व हेड गर्लपदी रिद्धी संत यांची निवड करून, त्यांना पदाची सूत्रे देऊन शपथ देण्यात आली.


संस्थेचे सचिव प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या सहभागाने एक हजार वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाचे प्रारंभ शाळेच्या आवारात वृक्षरोपणाने करण्यात आला. तर पालकांना रोपांचे वाटप करण्यात आले.


प्रारंभी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. शिक्षक पालक सहविचार सभेत शाळेत या वर्षीपासून वापरण्यात येणारे डिजिटल स्कूल ॲपची माहिती देण्यात आली. या ॲपद्वारे पालकांना विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी, होमवर्क, शैक्षणिक कामकाज, परीक्षा वेळापत्रक, गुणवत्तेचा लेखाजोखा व विविध शालेय उपक्रमाची माहिती दिली जाणार आहे. प्रास्ताविक गणेश खुडे यांनी केले. आभार नामदेव लिंभोरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *