• Wed. Feb 5th, 2025

विद्यार्थ्यांनी जाणून घेतले आग विझवण्याचे तंत्र

ByMirror

Jan 23, 2025

विस्डम विंग्स प्री स्कूलची अग्निशामक दलाला भेट

नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी थेट अग्निशामक दलात शाळेची सहल नेण्यात आली. तर चिमुकल्या विद्यार्थ्यांना आग अग्निशमन केंद्रावर आग विझवण्याचे वेगवेगळे तंत्र अवगत करण्यात आले. राहुरी येथील विस्डम विंग्स प्री स्कूलच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. अचानक लागलेली आग कशी विझवली जाते? याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.


नुकतेच विस्डम विंग्स प्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राहुरी येथील अग्निशामक दलाला भेट दिली. अग्निशामक दलाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अग्निशामक दल कसे कार्य करते व लागलेली आग त्या ठिकाणी जाऊन कशी बुझवली जाते याची सविस्तर माहिती दिली. अचानक आग लागल्यानंतर नागरिकांनी ते विझविण्यासाठी काय करावे? याचे देखील प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.


अग्निशामक दलात नव्याने दाखल झालेल्या दुचाकी अग्निशामक वाहन व पाण्याच्या बोटीची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. फायर प्रुफ जॅकेट व हेल्मेट काही विद्यार्थ्यांना घालून सायरणच्या आवाजात आग शमविण्याचे प्रात्यक्षिक यावेळी रंगले होते. विद्यार्थ्यांना वाहनचालक माननीय विलास गडाख, अमोल गिरगुणे, फायरमन बाळासाहेब पवार, बाळासाहेब गारुडकर व संतोष घोटेकर यांनी मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमाप्रसंगी प्रीस्कूलच्या प्राचार्या अरुंधती नुरील भोसले, शिक्षिका ज्योती भोर, वृषाली सोनवणे, प्रियांका भालेराव उपस्थित होत्या. प्राचार्या अरुंधती भोसले यांनी लहान वयातच विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनेचे धडे दिल्यास भविष्यातील गंभीर धोके टाळता येणार आहे. विद्यार्थ्यांची सहल काही तरी वेगेळे शिकण्याच्या उद्देशाने राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अग्निशामक दलप्रमुख राजेंद्र पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *