• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी सजवली स्नेहाची राखी!

ByMirror

Aug 6, 2025
राखी बनवा कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग;

राखी बनवा कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग;


राखींच्या मागील भाऊ-बहिणीच्या प्रेमाच्या भावना घेतल्या समजून

नगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी राखी बनवा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्साहाने सहभाग नोंदवून आपल्या कल्पकतेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या आकर्षक राख्या तयार केल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील रक्षा बंधनाचे महत्त्व सांगण्यात आले.


या कार्यशाळेचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध रंगी दोऱ्या, मणी, झिरमिळ्या, कागद, फेटी आणि इतर कलात्मक साहित्य वापरून अत्यंत देखण्या व कल्पक राख्या तयार केल्या. केवळ सजावट नव्हे, तर त्या राखींच्या मागील भावनाही विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या.


या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये केवळ कलाचातुर्य वाढवण्यापुरते मर्यादित न राहता, भारतीय संस्कृतीची खरी ओळख निर्माण होते, हे शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या मुला-मुलींनी अत्यंत आनंदाने आपापल्या हातांनी राखी तयार करत रक्षा आणि बंध या दोन महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ प्रत्यक्ष अनुभवला. या उपक्रमामुळे मुलांच्या मनात भारतीय सण, परंपरा व कुटुंबातील नात्यांची नाळ अधिक घट्ट होण्यास मदत होणार असल्याची भावना मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी व्यक्त केली.


कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षिका मिनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, शितल रोहोकले, जयश्री खांदोडे, सोनाली अनभुले, रुपाली वाबळे, इंदूमती दरेकर, पुनम घाडगे, भाग्यश्री लोंढे, भारती सुसरे, कांचन मदने, विद्या बडवे यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचे प्रदर्शनही भरवण्यात आले, ज्यामध्ये पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कला-कौशल्याचे कौतुक केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *