• Wed. Jul 2nd, 2025

दीड हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटपाचा प्रारंभ

ByMirror

Jul 2, 2024

घर घर लंगर सेवा, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबचा पुढाकार

घर घर लंगर सेवेचे समाजकार्य स्फुर्ती व प्रेरणा देणारे -शरद मुनोत

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात गरजूंची भुक भागविणाऱ्या व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या घर घर लंगर सेवा, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांच्या वतीने शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मोहिमेचे प्रारंभ दादा चौधरी विद्यालयापासून करण्यात आले. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील दीड हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप केले जाणार आहे.


दादा चौधरी विद्यालयात सामाजिक कार्यकर्ते शरद मुनोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी घर घर लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, सतीश गंभीर, प्रशांत मुनोत, सुनिल थोरात, मुन्नाशेठ जग्गी, राजेंद्र कंत्रोड, गुलशन कंत्रोड, कैलाश नवलानी, दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिता जामगावकर, मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या अनुरिता झगडे आदींसह सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हरजितसिंह वधवा म्हणाले की, कोरोना काळापासून विद्यार्थ्यांना आधार देण्याचे काम लंगर सेवेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही सेवा जिल्ह्यापुरती मर्यादीत न राहता राज्यात व राज्याबाहेर देखील पोहचली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


शरद मुनोत म्हणाले की, घर घर लंगर सेवेचे समाजकार्य स्फुर्ती व प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या नवनवीन संकल्पना समाजातील गरजूंना आधार ठरत आहे. लंगर सेवेचे सेवादार विविध सामाजिक कार्याने जोडले गेले असून, शहरात एक मोठी सामाजिक चळवळ या सेवादारांच्या माध्यमातून उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले.


प्राचार्या प्रा. अनुरीता झगडे यांनी घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून गरजवंत मुलांना शालेय साहित्य व दप्तर मिळाल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार असल्याचे स्पष्ट केले. मुख्याध्यापक सुनिता जामगावकर यांनी लंगर सेवेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात सुरु असलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले.


उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दादा चौधरी विद्यालय व मेहेर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असलेल्या किटचे वितरण करण्यात आले. या किटमध्ये दप्तर, चार नोटबुक व कंपासचा समावेश आहे. तसेच सिताराम सारडा विद्यालयातही शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
परिस्थिती अभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी त्यांना शिक्षणास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध गाव, तालुका पातळीवर व नांदेड, बीड, गोवा येथे देखील लंगर सेवेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याची गरजू विद्यार्थ्यांना वाटप होणार आहे. या उपक्रमासाठी शरद मुनोत, डॉ. एस.एस. दीपक व उत्कर्षा रुपवते यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.


हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्सचे अध्यक्ष धनंजय भंडारे, राहुल बजाज, सोमनाथ चिंतामणी, राजू जग्गी, राजा नारंग, सिमर वधवा, जस्मीतसिंह वधवा, सुनील छाजेड, राजेश कुकरेजा, अर्जुन मदान, मनोज मदान, दामोदर माखिजा, शरद बेरड, सुनिल मेहतानी, करण धुप्पड, अमरजितसिंह वधवा, बलजित बिलरा, जय रंगलानी, विपुल शाह, डॉ. संजय असनानी, प्रमोद पंतम, दलजीतसिंह वधवा, सनी वधवा, जतिन आहुजा, किशोर मुनोत, संदेश रपारिया आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *