विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रीथीज पाठशाळेचा उपक्रम
तोंडी व लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांनी दाखवली बुध्दीमत्तेची चुणूक
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना देण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी प्रीथीज पाठशाळेच्या वतीने शहरात स्पेल इट वेल या आंतरशालेय इंग्रजी स्पेलिंग कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इंग्रजी भाषेतील विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह व त्याचे योग्य स्पेलिंग अवगत करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
भोसले आखाडा, साईनगर येथील किड्स जी स्कूलमध्ये झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन प्रमोद गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्या हर्षा चौहान व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी उपस्थित होते. प्रीथीज पाठशाळेच्या संस्थापिका प्रीती मुथियान यांनी लहान वयातच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांना सामोरे जाण्याची सवय होण्यासाठी व इंग्रजीतील स्पेलिंगची योग्य माहिती होण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. सह संस्थापक चेतन मुथियान यांनी उपस्थित पाहुणे व पालकांचे स्वागत केले. या स्पर्धेदरम्यान पालकांसाठी वेदिक गणितच्या युक्त्या आणि मुलांच्या स्पेलिंग सुधारण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

या स्पर्धेत शहर व उपनगरातील इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमधील दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवला. तोंडी व लेखी पध्दतीने पार पडलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या बुध्दीमत्तेची चुणूक दाखवली. पाच गटात ही स्पर्धा पार पडली. याचे परीक्षण जसलीना बार्नाबस, रितिका निलेश लोखंडे, तन्वी सागर शाह, आर. सुमित्रा, अनिता गंभीर, शिल्पी शाह, मोना पोखरणा, प्रिया चोपडा, सपना बोगावत, अनघा गाढे यांनी केले.
एलकेजी गटात प्रथम- यशवर्धन सुद्रीक, द्वितीय- युगंधारा सुद्रीक, तृतीय- भवीन चुत्तर, युकेजी गटात प्रथम- अन्विता प्याती, द्वितीय- इशान यादवानी, तृतीय- प्रेक्षा पारेख, पहिली ते दुसरी गटात प्रथम- आधिराज चौधरी, द्वितीय- विवान शर्मा, तृतीय- प्रारब्धी मंत्री, उत्तेजनार्थ- देव धमेचा, इहान बच्छावत, तिसरी ते चौथी गटात प्रथम-कबीर मुजावर, द्वितीय- अनुष्का भिसे, तृतीय- सम्यक गांधी, उत्तेजनार्थ- नक्श मेघानी, आर्णवी चौहान, पाचवी ते सहावी गटात प्रथम- हेम भंडारी, द्वितीय- ध्रुवी चोरडिया, तृतीय- अनय कर्णावट यांनी बक्षिसे पटकाविली. स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व फन की लॅण्डचे मोफत प्रवेशिका देण्यात आल्या. तर स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र फन की लॅण्डचे डिस्काउंट कुपन देण्यात आले. स्पर्धेचे नियोजन सचिन कानडे यांनी केले होते. स्पर्धेसाठी फंकी लॅण्ड अम्युझमेंट इंडोर पार्कचे सहकार्य लाभले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रीथिज पाठशाळेच्या सोनिया घांगाळे, रीना मुनोत, शीतल मुनोत, मैथिली जोशी, प्रगती व्यावहारे, खुशी डागा, रुशिता गुजराथी, कोमल पाठक, सहाय्यक टीमच्या दिव्या मुथियान, सोनम मंत्री, सोनल नहार, सोनम खिलारी, मनीषा निमसे, कौस्तुभ चोपडा यांनी परिश्रम घेतले.