ओ.पी. नय्यर हिट्समध्ये नगरकर मंत्रमुग्ध
नगर (प्रतिनिधी)- हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम संगीतकार ओ.पी. नय्यर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित ओ.पी. नय्यर हिट्स दिल की आवाज भी सून! हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम नुकताच माऊली सभागृह दिमाखात पार पाडला. अहिल्यानगर मधील अनाहत एक कलासृष्टी या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात अनाहत एक कलासृष्टीच्या वतीने खऱ्या अर्थाने रसिक राजा असलेले व कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन, शाबासकी आणि कौतुकाची थाप देणारे सुरांचा सांगाती धनेश बोगावत यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माऊली सभागृहाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृह व्यवस्थापनाच्या वतीने रंगमंच, नटराज, पडदा आणि ध्वनीक्षेपक यांचे पूजन करण्यात आले. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अनिल बोरुडे, विलास बडवे, सुकी गायक पवन नाईक, अभिनेते मोहनीराज गटणे, रवींद्र बारस्कर आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराज पूजन करून मैफलीला सुरुवात करण्यात आली. या मैफिलीत ओ.पी. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली एकापेक्षा एक अशी सुमधुर गाणी सादर करण्यात आली.
