राष्ट्र भावनेने प्रेरित होऊन देत असलेल्या सामाजिक योगदानाचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनतर्फे स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना राष्ट्र भावनेने प्रेरित होऊन समाज उपयुक्त काम करत असल्याबद्दल व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड 2024 ने गौरविण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हॉटेल संजोग येथे झालेल्या कार्यक्रमास रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुरेश साबू, जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी जयश्री पाटील, रोटरी क्लबचे मिडटाऊनच्या सेक्रेटरी मार्लिन एलिशा, डॉ. प्रसाद उबाळे, व्होकेशनल सर्विसचे डायरेक्टर विवेक हेगडे, प्रोजेक्ट चेअरमन ॲड. हेमंत कराळे आदी उपस्थित होते.
मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. समाज कार्याला वाहून घेणाऱ्या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनतर्फे व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड मिळाला याबद्दल रोटरीचा आभारी आहे. या गौरवामुळे समाज उपयुक्त काम करण्यास प्रेरणा मिळणार असल्याची भावना डॉ. उद्धव शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केली. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
