• Tue. Oct 14th, 2025

शिवाजी उबाळे यांचा उद्योगरत्न पुरस्काराने गौरव

ByMirror

Sep 27, 2025

वाहतूक क्षेत्रातील सामाजिक योगदानाबद्दल सन्मान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर लक्झरी व स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी उबाळे यांना नुकताच उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाहतूक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.


शिवाजी उबाळे यांनी कोरोना महामारीच्या काळात जेव्हा संपूर्ण समाज संकटात सापडला होता, या कठीण परिस्थितीत पुढाकार घेऊन त्यांनी वाहतूक क्षेत्रातील अडचणी कमी करण्यासाठी काम केले. वाहनचालक व मालकांच्या कुटुंबांना आधार देणे, मदत साहित्य पोहोचवणे आणि आवश्‍यक सेवा सुरु ठेवणे यात त्यांनी विशेष योगदान दिले. आषाढी व इतर धार्मिक दिंडी यात्रांच्या काळात सुरक्षित, वेळेवर आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेसाठी उबाळे सातत्याने प्रयत्नशील असतात. यात्रेकरूंच्या सोयीसाठी त्यांनी केलेले हे कार्य नेहमीच कौतुकास्पद ठरले आहे.


वाहतूक क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्या, विशेषतः वाहनचालक आणि वाहनमालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे प्रश्‍न मार्गी लावले आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन उबाळे यांना लोकसत्ता संघर्ष कडून उद्योगरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *