श्री विशाल गणपती मंदिरात आरती; नागरिकांसह कार्यकर्त्यांना पेढे वाटप
महापालिकेवर भगवा फडकविण्याचा संकल्प
नगर (प्रतिनिधी)- शहरात शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिवस गुरुवारी (दि.19 जून) उत्साहात साजरा करण्यात आला. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात आरती करुन माळीवाडा वेस येथे नागरिकांसह कार्यकर्त्यांना पेढे वाटप करण्यात आले. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करुन महापालिकेवर भगवा फडकविण्याचा संकल्प केला.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, दिलीप सातपुते, माजी महापौर सुरेखा कदम, रोहिणी शेंडगे, माजी पंचायत समिती सभापती रामदास भोर, संजय शेंडगे, माजी नगरसेवक आप्पा नळकांडे, दत्ता कावरे, अनिल लोखंडे, दत्ता जाधव, संतोष ग्यानप्पा, दीपक खैरे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, महेश लोंढे, सुनील लालबोंद्रे, रवींद्र लालबोंद्रे, ओमकार शिंदे, पारुनाथ ढोकळे, अजित दळवी, अभिषेक भोसले, अशोक दहिफळे, विशाल शितोळे, दशरथ शिंदे, सचिन लोखंडे, विनोद गायकवाड, संग्राम कोतकर, अक्षय भिंगारे, सुनील भिंगारदिवे, अभिजीत तांबडे, घनश्याम घोलप आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन जाधव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने स्व. बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या विचाराने हिंदुत्वाचा वारसा घेऊन वारसा घेऊन शिवसेना पुढे जात आहे. सर्वसामान्यांना न्याय देऊन त्यांच्या हातात सत्ता देण्याचे काम शिवसेनेने केले. आजही शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांसाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल शिंदे यांनी हिंदुत्वाचे ज्वलंत विचार घेऊन एकनाथ शिंदे स्व. बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकार ठाकरे यांचा वैचारिक वारसा चालवत आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामातून शिवसेनेची खरी ओळख जनतेला पटली आणि जनतेचे त्यांचे नेतृत्व मान्य करुन विधानसभेत मोठ्या संख्येने शिवसेनेचे उमेदवार निवडून दिल्याचे त्यांनी सांगितले.
संभाजी कदम म्हणाले की, देशाच्या इतिहासात नोंद घेण्यासारखे शिवसेनेचे कार्य आहे. शिवसेनेच्या माध्यमातून स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांमधील स्वाभिमान जागा करुन त्यांना उभे करण्याचे काम केले. आजही तो वारसा व विचाराने शिवसेना कार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.