अहमदनगर (प्रतिनिधी)- शकुंतला लक्ष्मण कुलकर्णी (रा. मिरजगाव, ता. कर्जत) 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. सध्या त्या शहरातील शनी मंदिर चौकात राहत होत्या. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या वांबोरी येथील महेश मुनोत विद्यालयाचे प्राचार्य संतोष कुलकर्णी व पालघर जिल्हा परिषदेचे उपअभियंता संजय कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत. मनमिळाऊ स्वभाव व धार्मिक वृत्तीचे असल्याने ते सर्वांना सुपरीचीत होत्या. मिरजगाव येथील विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

