डीप फ्रीजसह एका महिन्याचे किराणा साहित्य, अन्न-धान्य व थंडीनिमित्त ब्लँकेट आणि गरजेच्या वस्तूंची मदत
अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने सावेडी, तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी डीप फ्रीजसह एका महिन्याचे किराणा साहित्य, अन्न-धान्य व थंडीनिमित्त ब्लँकेट आणि गरजेच्या वस्तूंची मदत करण्यात आली. उपेक्षित, वंचित समाजातील मुलांना आधार देण्यासाठी सेवाप्रीतच्या महिलांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला.
यावेळी ग्रुप लिडर गीता नय्यर, सविता चड्डा, अध्यक्षा जागृती ओबेरॉय, सोनाली ग्रोवर, सत्या वधवा, प्रेरणा वधवा, इशा जग्गी, टिना इंगळे, राजेंद्र जग्गी, दिव्या पोखरणा, गीता तलवार, निकिता पंजाबी, सुची मल्होत्रा, शीतल वाघ, निकिता गुप्ता, पल्लवी शहा, गिता मित्तल, भावना नय्यर, संगीता मेघानी, निशा नारंग, सलोनी आहुजा, दर्शना गुगळे, मंजू ललवानी, स्विटी बलदोटा, सुमिता वाही, साक्षी चुग, तृप्ती सराफ, माधुरी सारडा, पुनम कुमार, करीना नवलानी, समिता अग्रवाल, शकुंतला गर्ग, अंजली मांडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

गीता नय्यर म्हणाल्या की, बालघर प्रकल्पाच्या निवासी पुनर्वसन प्रकल्पामध्ये 40 मुले राहून शिक्षण घेत आहे. संस्था लोकसहभागातून चालत असून, या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आधार देण्यासाठी सेवाप्रीतच्या वतीने मदत करण्यात आले. सेवाप्रीत सातत्याने वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य करत आहे. समाजाचे देणे लागते या भावनेने महिलांनी पुढाकार घेऊन ही चळवळ चालवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, जीवनात ध्येय गाठण्यासाठी परिश्रम व कष्ट करण्याची तयारी ठेवावी. सामर्थ्य, बुद्धिमत्ता व परिश्रम अंगीकारल्यास कोणत्याही क्षेत्रात यश निश्चित आहे. बिकट परिस्थितीतून व अडचणीतून मार्ग काढावा लागतो. विद्यार्थ्यांनी जीवनाची दिशा व ध्येय ठरवून त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांना महिलांनी खाऊ व चॉकलेटचे वाटप करुन त्यांच्यासह मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला. बालघर प्रकल्पाचे युवराज गुंड यांनी सेवाप्रीतने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करुन आभार मानले.