• Thu. Oct 30th, 2025

सेवाप्रीतने बालघर प्रकल्पातील मुलांसाठी उपलब्ध केले स्वच्छतागृह

ByMirror

Apr 24, 2024

वंचित, निराधार मुलांनी लुटला उन्हाळी सुट्टीचा आनंद

मुलांना खेळण्यासाठी झोक्याची व्यवस्था

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने बालघर प्रकल्पातील वंचित, अनाथ व निराधार मुलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करुन देण्यात आले. तर मुलांना खेळण्यासाठी झोक्यांची व्यवस्था करुन देण्यात आली. उन्हाळी सुट्टीत मुलांना खेळता-बागडता यावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.


सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, प्रकल्प प्रमुख गीतांजली माळवदे, ग्रुप लिडर अर्चना खंडेलवाल, रितू वधवा, तृप्ती कोठारी, स्मिता देशमुख, मनिषा कंक, पूजा गोंडाळ, वंदना गोसावी, दिपाली देऊतकर, वैशाली उत्तेकर, अंजली गायकवाड, स्मिता मालवे, उर्मिला सायंबर, सुनिता लेकुरवाळे, दीपा रोहिडा, माधुरी येळाई, भारती यादव, सोनी पाठक, आरती कुलकर्णी, डॉ. राजश्री मगर, संगीता भागवत, नूतन भोसले, रोहिणी पाटील, सोनिया कुंद्रा, डॉ. निशा पाटील, रेणुका दौड, आरती थोरात आदींसह महिला सदस्या उपस्थित होत्या.


जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, वंचित घटकातील मुलांना आधार देऊन समाजात उभे करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सामाजिक जाणीव ठेऊन प्रत्येकाने आपल्या उत्पन्नातील काही वाटा गरजूंच्या शिक्षणासाठी खर्च केल्यास समाजाची प्रगती साधली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


गीतांजली माळवदे म्हणाल्या की, गरीब-श्रीमत ही दरी दूर करण्यासाठी दुर्बल घटकांच्या शिक्षणासाठी प्रभावीपणे कार्य करावे लागणार आहे. अशा घटकातील विद्यार्थ्यांकडे कमीपणाने न पाहता त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. उन्हाळी सुट्टीत सर्वच मुले सहल काढतात, उन्हाळी शिबिरात खेळतात-बागडतात, या मुलांचे बालपण कोमेजून न जाता त्यांना सुट्टीचा आनंद घेण्याचा उद्देशाने सेवाप्रीतने मदतीचा हात दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मुलांनी यावेळी सेवाप्रीतने उपलब्ध करुन दिलेल्या भेळपुरी, रगडा पॅटीस, कुल्फी, मिठाई आदी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. बालघर प्रकल्पातील मुला-मुलींसाठी स्वातंत्र्य स्वच्छतागृह व आंघोळीसाठी बाथरुमची व्यवस्था करुन देण्यात आली. याचा लोकार्पण उपस्थित सेवाप्रीतच्या महिलांच्या हस्ते पार पडला.


बालघर प्रकल्पाचे संस्थापक युवराज गुंड यांनी सामाजिक संवेदना जागरुक ठेऊन सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या महिलांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. तर वंचित मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांचे नेहमीच सहकार्य मिळत असल्याबद्दल आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *