शुक्रवारी रंगणार उपांत्य व अंतिम सामने
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बॅटलडोर बॅडमिंटन अकॅडमीच्या वतीने कै. श्रीमती संजीवनी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरु असलेल्या 17 वर्षा आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा आणि 15 वर्ष आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी (दि.11 जुलै) वैयक्तिक सामन्यांचे उपांत्यपूर्व सामने रंगतदार झाले.

उपांत्यपूर्व सामान्यात विजयी झालेल्या खेळाडूंचे शुक्रवारी सकाळी उपांत्य फेरीचे व संध्याकाळी अंतिम सामने रंगणार आहेत. गुरुवारी सकाळच्या सत्रात 80 तर संध्याकाळच्या सत्रात 40 सामने झाले.
उपांत्यपूर्व फेरीत रंगलेल्या सामन्यांमध्ये 15 वर्षा आतील मिश्र दुहेरीत सयाजी शेलार व शौर्या शेलार (पुणे) विरुध्द कपिल जगदाळे (पुणे) व दर्शिता राजगुरु (नाशिक) (जगदाळे व राजगुरु विजयी 13-21 21-9 21-18), 17 वर्षा आतील मिश्र दुहेरीत पार्थ देओरे (नाशिक) व तन्वी घारपुरे (ठाणे) विरुध्द सानिध्य एकाडे (ठाणे) व प्रक्रिती शर्मा (मुंबई उपनगर) (देओरे व घारपुरे विजयी 21-16 18-21 21-17), यश ढेंबारे व मनस्वी चौहान (ठाणे) विरुध्द रुत्वा सजवान व शौर्या मडावी (नागपूर) (सजवान व मडावी विजयी 14-21 21-11 21-16), 17 वर्षा आतील मुलांमध्ये स्पर्श कावळे (नागपूर) विरुध्द आर्यन बिराजदार (ठाणे) (बिराजदार विजयी 14-21 21-17 21-11) या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

उपांत्यपूर्व सामन्यात विजय संपादन करुन उपांत्य फेरीत गेलेले खेळाडू पुढीलप्रमाणे:-
15 वर्षा आतील मिश्र दुहेरी- आयुष अडे (पुणे), शौर्य रांजणे (पुणे), अफेल मॅस्करनहस (मुंबई उपनगर), आर्य मिस्त्री (मुंबई उपनगर), कपिल जगदाळे (पुणे), धारिष्ट्य राजगुरु (नाशिक), स्वरीत सातपुते (पुणे), रुतिका कांबळे (कोल्हापूर),
15 वर्षा आतील मुली दुहेरी- ख्याती कात्रे (पुणे), विधी सैनी (अहमदनगर), रिषा परब (मुंबई), श्रावणी बामनकर (पालघर), हिता अग्रवाल (नाशिक), सिया वायदंडे (नाशिक),
15 वर्षा आतील मुले दुहेरी- सयाजी शेलार (पुणे), ज्ञान देशमुख (औरंगाबाद),
15 वर्षा आतील मुली- यशवी पटेल (पुणे), अनुष्का इपटे (रायगड), ध्रिती जोशी (पुणे), दर्शिता राजगुरु (नाशिक),
15 वर्षा आतील मुले- सचित त्रिपाठी (पुणे), अरहम रिध्दसानी (पुणे), यश सिन्हा (ठाणे), आयुष अडे (पुणे),
17 वर्षा आतील मिश्र दुहेरी- प्रज्ञा गाडेवार (नागपूर), निशिका गोखे (नागपूर), अवधुत कदम (पुणे), युतिका चौहान (पुणे), पार्थ देओरे (नाशिक), तन्वी घारपुरे (ठाणे), रुत्वा सजवान (नागपूर), शौर्या मडावी (नागपूर),
17 वर्षा आतील मुले दुहेरी- कोणार्क इंचेकर (पुणे), सार्थक पटाणकर (पुणे),
17 वर्षा आतील मुले- एन रेड्डी (मुंबई उपनगर), आर्यन बिराजदार (ठाणे),
17 वर्षा आतील मुली- रिधीमा सरपटे (नागपूर),