• Sat. Sep 20th, 2025

सरपंच परिषदेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

ByMirror

Dec 1, 2023

रविवारी यशदा पुणे येथे होणार वितरण -आबासाहेब सोनवणे

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील सरपंच आणि विकसित गाव यासाठी कार्यरत असणाऱ्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. रविवारी (दि.3 डिसेंबर) पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा) बाणेर रोड (पुणे) येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पद्मश्री पोपट पवार, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे राज्य कोअर कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी दिली आहे.


ग्रामीण भागात अत्यंत चांगले काम करणारे लोकप्रतिनिधी आ. ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू (अचलपूर), आ. अभिमन्यू दत्तात्रय पवार (औसा), सुमनताई आर.आर. आबा पाटील (कौठे महांकाळ), आ. सुनील शंकरराव शेळके (मावळ), आ. कृष्णा दामाजी गजबे (आरमोरी) तसेच उत्कृष्ट काम केलेल्या मृदा व जलसंधारण खात्याचे राज्य सचिव सुनील साहेबराव चव्हाण (आष्टी), भिवंडीचे पोलीस उपायुक्त नवनाथ ठकाजी ढवळे (पारनेर), राज्याचे शिक्षण सचिव शैलेंद्र देवळानकर (पुणे), वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव रामभाऊ देसले पाटील (कोपरगाव), उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन ज्ञानेश्‍वर शेळकंदे (सोलापूर), गट विकास अधिकारी सतीश बुध्दे (सातारा), यांच्यासह सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या पद्मश्री लीला फिरोज पूनावाला (पुणे), एकनाथ विठ्ठल गाडे (जांभूळ, ता. मावळ) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.


तसेच राज्यातील आदर्श सरपंच पुरस्कारासाठी राजश्री मनोहर भोसीकर (पानभोसी, ता. कंदार, नांदेड), दत्तात्रय दादाराव खोटे (सांगवी, बीड), ज्योती हेमराज पाटील (मोहाडी, ता. पाचोरा, जळगाव), चंद्रकांत साहेबराव पाटील (गणेशपुर, ता. चाळीसगाव), पांडुरंग शंकर तोरगले (मासेवाडी, ता. आजारा कोल्हापूर), जिजाभाऊ ज्ञानेश्‍वर टेमगीरे उर्फ जे.डी. साहेब (थोरांदळे, ता. आंबेगाव, पुणे), निकिता चंद्रशेखर रानवडे (नांदे, ता. मुळशी, पुणे), विजय मुरलीधर शेवाळे (वडगाव गुप्ता, अहमदनगर), सुनिता बाळू तायडे (गाते, ता. रावेर), सदाशिव रामचंद्र वासकर (पुंडवहाळ, ता. पनवेल, रायगड), सदानंद मंडोपंत नवले (नाशिक) यांचा समावेश आहे.


आदर्श ग्रामसेवक पुरस्कारसाठी आबासाहेब दिलीपराव खिलारे (कडा, बीड), विजयसिंह विलासराव नलावडे (धाराशिव), कमल तिडके तावरे (नांदेड), तर आदर्श शिक्षक पुरस्काररासाठी सोमनाथ बबन भंडारे (वडु बुद्रुक, ता. शिरूर), उत्तम महादेव कोकितकर (आजरा किटवडे, कोल्हापूर), किशोर चंद्रकांत नरवाडे (चिखली, नांदेड), शहाजी महावीर जाधव (गंजोटी, उमरगा), युवा उद्योजक बाबुभैय्या उर्फ बाबासाहेब सुधाकर गर्जे (बावी, बीड) यांची निवड झाली आहे.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. विकास जाधव, प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस, कोअर कमिटी अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, विश्‍वस्त आनंदराव जाधव, किसन जाधव, राणीताई पाटील, शिवाजी आप्पा मोरे, अश्‍विनीताई थोरात, सुप्रियाताई जेधे, सुधीर पठारे, नारायण वनवे आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *