साहित्य क्षेत्रातील कार्याचा गौरव
नगर (प्रतिनिधी)- येथील कवयित्री, मुक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षा तथा साहित्यिक गुंफाताई कोकाटे यांच्या हस्ते आल्हाट यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, कवी संमेलनाच्या अध्यक्षा मनिषा गायकवाड, कवियत्री सरोज अल्हाट, संमेलनाचे संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, कवी आनंदा साळवे, संभाजी नगर जिल्हा परिषदचे माजी सभापती मारुती साळवे, दिलावर शेख, साहेबराव बोडखे, भाऊसाहेब ठाणगे, विस्तार अधिकारी नलिनी भुजबळ, रामदास फुले आदी उपस्थित होते.
आल्हाट यांना यापूर्वीही त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्यासाठी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
