साहित्य क्षेत्रातील कार्याचा गौरव
नगर (प्रतिनिधी)- कवयित्री, मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय कृतिशील आदर्श साहित्यिक पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे यशवंत सेना आणि जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवानिमित्त पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सरोज आल्हाट यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी यशवंत सेनाचे सरसेनापती माधव गडदे, शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर, जिल्हाध्यक्ष विजय तमनर आदी उपस्थित होते. सरोज अल्हाट यांना यापूर्वीही राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. सदर पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.