• Wed. Oct 15th, 2025

केडगावच्या सरस्वती विद्यालयाच्या शैक्षणिक रौप्य महोत्सवाची पहिली पालक सभा उत्साहात

ByMirror

Jul 2, 2024

विद्यार्थ्यांचा वाढदिवस एक विद्यार्थी एक झाड उपक्रमाद्वारे साजरा करण्याचा निर्णय

शिक्षक पालक संघ, माता पालक संघ व परिवहन समितीवर नियुक्त्या

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती विद्यालयात 2024-25 या शैक्षणिक रौप्य महोत्सवाची पहिली पालक सभा पार पडली. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालकांच्या उपस्थितीमध्ये शिक्षक पालक संघ, माता पालक संघ व परिवहन समिती स्थापना करुन विविध पदावर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.


शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षपदी बिभीषण कातखडे तर उपाध्यक्षपदी अंकुश गायके याची निवड करण्यात आली. माता पालक संघाच्या अध्यक्षपदी प्रणिता समीर कुलकर्णी व उपाध्यक्षपदी सुजाता दुशिंग यांची निवड करण्यात आली. तसेच परिवहन समितीच्या अध्यक्षपदी अनिल झिरपे यांची निवड करण्यत आली. प्रत्येक समितिच्या सचिवपदी मुख्याध्यापक संदीप भोर हे राहणार आहेत.


या सभेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी या वर्षात घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची, स्पर्धा परीक्षा, इंडियन नॅशनल ओलिम्पियाड, नवोदय परीक्षा, विविध शिष्यवृत्ती परीक्षांची माहिती पालकांना देण्यात आली. 2024 -25 हे वर्ष संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असून, या वर्षीही शाळेचा गुणवत्ता आलेख अजून वाढवण्यासाठी शाळेचे प्रयत्न राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी पालकांनी कोणती भूमिका बजवावी यावर मार्गदर्शन करण्यात आले.


या सभेसाठी संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ताजी जगताप हे उपस्थित होते. त्यांनी पालकांशी संवाद साधत शाळेत असणाऱ्या अडचणी व त्यामध्ये करावायचे बदल इत्यादी विषयावर चर्चा केली. तसेच पालकांनी केलेल्या सूचना आणि त्यांनी सुचवलेले उपक्रम यांचे देखील विचार केला जाणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेत एक विद्यार्थी एक झाड उपक्रमाद्वारे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेसाठी समाजसेवक अनिल झिरपे, मुख्याध्यापक संदीप भोर, मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी आदींसह शालेय शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *