• Sat. Nov 1st, 2025

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

ByMirror

Oct 31, 2025

वृक्षारोपण व स्वच्छता राबवून एकता दौड मध्ये सहभाग


सरदार पटेल यांनी अखंड भारताची पायाभरणी केली, तर इंदिरा गांधी यांनी देशाचे कणखर नेतृत्व केले -संजय सपकाळ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.


या प्रसंगी दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच ग्रुपचे सर्व सदस्य भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन आणि छावणी परिषदेच्या वतीने आयोजित एकता दौड मध्ये सहभागी झाले होते.


सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, आणि ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संपतराव बेरड आणि किरण फटांगरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.या कार्यक्रमाला सर्वेश सपकाळ, जहीर सय्यद, दिलीपराव ठोकळ, अभिजीत सपकाळ, सईद सय्यद, रतन नेहेत्रे, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, दिलीप गुगळे, दीपक धाडगे, मनोहरराव दरवडे, सुधीर कपाळे, दिपकराव घोडके, राजू चंगेडिया, विलासराव आहेर, अशोकराव पराते, अविनाश जाधव, दिनेश शहापूरकर, संजय भिंगारदिवे, सरदारसिंग परदेशी, सुंदरराव पाटील, प्रकाश देवळालीकर, प्रशांत चोपडा, दीपक लिपाने, विशाल भामरे, दीपक अमृत, शेषराव पालवे, मुन्ना वाघस्कर, रामनाथ गर्जे, निजाम पठाण, संतोष हजारे, सुधाकर चिदंबर, जालिंदर अळकुटे, सखाराम अळकुटे, गणेश सातकर, खी ताटें, राजु शेख, भरत कनोजिया, दीपक शिंदे, दुर्वेश शहापूरकर, विजयकांत बोथरा आदी उपस्थित होते.


छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी आणि कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी हरदिन ग्रुपच्या सामाजिक, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले. तसेच एकता दौड मध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. या वेळी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव राठोड व पदाधिकारी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, भारताच्या एकसंघतेचे प्रतीक म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. त्यांनी 562 संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारताची पायाभरणी केली. तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कठीण परिस्थितीत कणखर नेतृत्व देत देशाला विकासाच्या मार्गावर नेले. त्यांच्या कार्यातून आजच्या तरुणांनी एकता, निष्ठा आणि राष्ट्रप्रेमाचे धडे घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.


सचिन चोपडा म्हणाले की, सरदार पटेल यांनी भारत एकसंघ ठेवण्यासाठी केलेला प्रयत्न आजच्या प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. आजच्या तरुण पिढीने त्यांच्या आदर्शाचे अनुकरण करून देशहितासाठी कार्य केले पाहिजे. इंदिरा गांधी यांचे नेतृत्व हे भारताच्या प्रगतीचे अधिष्ठान ठरले. महिलांना समाजात उभे राहण्यासाठी त्यांनी दिलेले धैर्य आणि नेतृत्व आजही प्रेरणा देते असे त्यांनी स्पष्ट केले.


ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे म्हणाले की, महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी ही फक्त औपचारिकता नसून त्यांच्या विचारांचे स्मरण करून ते आचरणात आणण्याची संधी असते. सरदार पटेल यांनी राष्ट्रएकतेचा पाया रचला आणि इंदिरा गांधींनी आत्मनिर्भरतेचा मंत्र दिला. आपण सर्वांनी त्यांचा आदर्श घेऊन समाजात एकता, सेवा आणि सद्भावनेचा संदेश देण्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *