एशियन फार्मसीचा उपक्रम
रक्तदान ही गरजू रुग्णांना जीवदान ठरणारी चळवळ -बापूसाहेब नागरगोजे
अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराने महाराजांना अभिवादन करण्यात आले. प्रोफेसर चौक, सावेडी येथील एशियन फार्मसीच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ. नागरगोजे, साई एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितीन नागरगोजे, डॉ. सचिन पांडुळे, डॉ. निनाद गाडेकर, डॉ. शैलेंद्र मरकड, डॉ. नरेंद्र मरकड, डॉ. अनिकेत कुऱ्हाडे, एशियन ग्रुप ऑफ फार्मसीचे संचालक दत्ता गाडळकर, मनोज खेडकर, पराग झावरे, युवराज खेडकर, भूपेंद्र खेडकर, अभिजीत गांगर्डे, रेनुल गवळी, किरण रासकर, डॉ. संदीप हापसे, राहुल जाधव, आदी उपस्थित होते.

बापूसाहेब नागरगोजे म्हणाले की, उत्तम आरोग्य, चांगले मित्र व शिस्त जीवनात यशाकडे घेऊन जाते. रक्तदान ही गरजू रुग्णांना जीवदान ठरणारी चळवळ आहे. रक्तासाठी मनुष्याला मनुष्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. या सामाजिक चळवळमध्ये प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. एशियन फार्मसी फक्त व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता सामाजिक, धार्मिक बांधिलकी जपण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर एशियन फार्मसीच्या वर्धापन दिनानिमित्त दहा भाग्यवान विजेत्यांच्या बक्षिसांची सोडत काढण्यात आली. अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे दर्शन यात्रेचे बक्षिस उत्कृष्ट वार्षिक ग्राहकाचा पुरस्कार विजेत्या सिंधुबाई घुगे दांपत्यास देण्यात आले.

औषध निर्माण शास्त्राच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यामधून विविध फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या रिसर्च प्रपोजल मधून एशियन फार्मसीच्या वतीने बेस्ट रिसर्च स्टुडन्ट ऑफ द इयर हा पुरस्कार श्रुतिका दळवी (एन.एम. सत्ता कॉलेज ऑफ फार्मसी) या विद्यार्थिनीला देण्यात आला. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.