अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विळद पाणी टाकी येथील सलिम युसूफ शेख ( वय 65 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते महापालिकेत गॅरेज विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात एक भाऊ, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्या निधनाबद्दल मित्र परिवारामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
विळद येथील सलिम शेख यांचे निधन
