• Mon. Jan 26th, 2026

रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग युथ विविध उपक्रमाने साजरा करणार जागतिक पोलिओ दिवस

ByMirror

Oct 22, 2023

मंगळवारी जनजागृती रॅलीचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- पोलिओ मुक्तीसाठी विशेष योगदान देणाऱ्या रोटरी क्लबच्या वतीने मंगळवारी (दि.24 ऑक्टोबर) रोजी जागतिक पोलिओ दिवस साजरा केला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग युथच्या वतीने पोलिओ मुक्तीच्या जनजागृतीचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती क्लबच्या अध्यक्षा शीलू मकर व सचिव आरती म्हात्रे यांनी दिली.


मंगळवारी शहरातून पोलिओची जनजागृती रॅली काढण्यात येण्आर आहे. तसेच शाळांमध्ये कुटुंबातील बाळांना पोलिओ लसीकरण करुन घेण्यासाठी व्हिडीओ क्लिप दाखविण्यात येणार असून, विविध माध्यमांतून रोटरीचे सदस्य पोलिओ मुक्तीची जनजागृती करणार आहेत. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 च्या प्रांतपाल स्वाती हेरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये हे उपक्रम एकाच वेळी राबवला जाणार असल्याचे बिंदू शिरसाठ यांनी स्पष्ट केले आहे.


पोलिओ कोणत्याही वयात उद्भवू शकतो. पण, प्रामुख्याने पाच वर्षांखालील मुलांमध्ये त्याची जास्त प्रमाणात लागण होऊ शकते. लसीकरण करून पोलिओवर मात करणे शक्य आहे. या पार्श्‍वभूमीवर रोटरीने 1985 मध्ये जागतिक पोलिओ निर्मूलनासाठी पुढाकार घेऊन पोलिओ प्लस कार्यक्रम सुरू केला. लसीकरण माध्यमातून पोलिओ निर्मूलन करण्यात रोटरीचे मोठे योगदान आहे. रोटरीने 1.6 अब्ज डॉलर्स खर्च करून जगातील स्वयंसेवकांमार्फत 122 देशांमधील 2.5 अब्जाहून अधिक मुलांचे लसीकरण केले आहे. ग्लोबल पोलिओ निर्मूलन संस्थेतही रोटरीचा सहभाग आहे. पोलिओच्या रुग्णसंख्येत 1980 पासून 99.9 टक्के घट झाली आहे. आज अफगाणिस्तान, नायजेरिया आणि पाकिस्तान तीन देशांमध्ये पोलिओचे रुग्ण आढळत असून, जगभरात 2015 मध्ये 75 पेक्षा कमी रुग्ण आढळले होते.


अन्य संस्थांसह रोटरीने पोलिओ निर्मूलनासाठी उभ्या केलेल्या प्रत्येक डॉलरसाठी बिल ॲण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन एकास एक प्रमाणात 35 दशलक्ष डॉलर्सची मदत या वर्षात करणार आहे. हा निधी वैद्यकीय कर्मचारी, प्रयोगशाळा उपकरणे, आरोग्य कर्मचारी आणि पालक आणि शैक्षणिक साहित्य इत्यादींसाठी वापरला जाईल. रोटरीचे सदस्य युनिसेफ आणि इतर भागीदारांबरोबर विविध भागातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही क्लबच्या अध्यक्षा शीलू मकर यांनी सांगितले आहे. जागतिक पोलिओ दिवस साजरा करण्यासाठी जागृती ओबेरॉय, नंदिनी जग्गी, सविता चड्डा, संगिता चंद्रण आदींसह रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग युथचे सदस्य प्रयत्नशील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *