माजी नगरसेविका संगीताताई खरमाळे पाठपुराव्याने प्रश्न मार्गी
नागरिकांच्या सोयीसाठी काँक्रिटीकरण काम सुरू
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील सावेडी प्रभाग क्रमांक 3 मधील मॉर्डन कॉलनी येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमीपूजन नुकतेच पार पडले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणेने व माजी नगरसेविका संगीताताई खरमाळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीतून हा प्रश्न मार्गी लावण्यात आला.
तीन कॉलनींना जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना पावसाळ्यात चिखल, खड्डे व धूळधाण अशा समस्यांना सामोरे जावे लागत होते. या कामाचे भूमीपूजन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजपचे सरचिटणीस निखिल वारे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुजित खरमाळे, मनीष शेळके, सुमित महाजन, प्रकाश रसाळ, बाळासाहेब देशमुख, सुनील गायकवाड, अमोल भिसे, श्रीधर शेळके, बाळासाहेब गुंजाळ, प्रभाकर खरात, डॉ. यवतकर, अमित खंडेलवाल, परसराम मोनाणी, सुषमा रसाळ, उमा खंडेलवाल, रेखा धोकरिया, ललिता व्यास, मंजिरी देशमुख, संगिता ढगे, दर्डा भाभी तसेच प्रभागातील माता-भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिल मोहिते म्हणाले की, भाजपचे पदाधिकारी व आजी-माजी नगरसेवक नेहमीच जनतेच्या प्रश्न सोडविण्याचे कार्य करत आहे. मूलभूत सोयींच्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने कार्य सुरु आहे. हा रस्ता गेली अनेक वर्षे रखडला होता, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता हे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.
संगीताताई खरमाळे म्हणाले की, मॉर्डन कॉलनीसह तीन कॉलनींना जोडणारा हा रस्ता नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. पावसाळ्यात चिखल, तर उन्हाळ्यात धुळीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. रस्त्याचा प्रश्न माजी खासदार सुजयदादा विखे यांच्या माध्यमातून सोडविण्यात आला असून, भाजपच्या माध्यमातून शहरातील प्रश्न सुटत असल्याचे ते म्हणाल्या. अनेक वर्षांचा रस्त्याचा प्रश्न सुटल्यामुळे स्थानिक नागरिकांनी संगीताताई खरमाळे यांचे आभार मानले.