पत्रकार राजेंद्र त्रिमुखे यांना पितृशोक
अहमदनगर (प्रतिनिधी)- निवृत्त सहायक फौजदार आणि वीरशैव कक्कय्या ढोर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर किसन त्रिमुखे यांचे बुधवारी (दि.21 फेब्रुवारी) वृद्धपकाळाने निधन झाले आहे. ते 87 वर्षाचे होते. राज्यात गाजलेल्या चांदा बाल हत्याकांडाचा तापसकामी त्यांनी मोलाची भूमिका बजावत गुन्हा उघडकीस आणला होता.
नगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात विशेष करून संगमनेर शहर आणि तालुक्यात सेवेत असताना त्यांनी उल्लेखनीय काम केले. पोलीस खात्या कडून तपास कामी त्यांना विविध पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते.
जेष्ठ पत्रकार राजेंद्र त्रिमुखे यांचे ते वडील होत. नगरच्या अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी पोलिस खात्यासह नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील नागरिक अंत्यविधीला उपस्थित होते.