मुर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड, हिंगणगाव फाटा (ता. नगर) येथील भिसे वस्तीत असलेल्या हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार करुन मंदिराचे रुप पालटले आहे. मंदिरात नुकतेच हनुमानजीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, जखणगावचे सरपंच डॉ. सुनिल गंधे, विजय भिसे, माजी सरपंच बी.आर. कर्डिले, बाळासाहेब जाधव, शिव व्याख्याती सुचेता भिसे, रामदास ठोकळ, जयश्री भिसे, स्वप्निल सोनवणे आदी उपस्थित होते.
अनेक वर्षापासून भिसे वस्तीत हनुमान मंदिर आहे. ग्रामस्थांची मंदिरावर मोठी श्रध्दा असून, मोठ्या संख्येने भाविक दर्शनास येत असतात. मंदिर जीर्ण झाल्याने त्याची पडझड झाली होती. विजय भिसे यांनी पुढाकार घेऊन मंदिर जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. या धार्मिक कार्यासाठी भिसे परिवाराने मोठे योगदान दिले आहे.
सकाळी विधीवत पूजा करुन हनुमानजीच्या मुर्तीची स्थापना करुन आरती करण्यात आली. यावेळी हनुमान चालीसाचे पठण झाले. भाविकांसाठी यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.