महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त युवक कल्याण योजनेअंतर्गत उपक्रम
महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे जनक -डॉ. भास्कर रणनवरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक क्रांतीचे जनक आहेत. प्रवाहाच्या विरोधात कार्य करून त्यांनी समाजाचा उध्दार केला. शिक्षण, शेतकरी, महिला, अंधश्रद्धा आदी सामाजिक समस्या सोडविण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करून क्रांती केली. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन युवकांनी कार्य करण्याचे प्रतिपादन डॉ. भास्कर रणनवरे यांनी केले.
उडाण फाउंडेशन, जिल्हा रुग्णालय, जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने युवक कल्याण योजनेअंतर्गत मोफत आरोग्य व रक्ताच्या विविध प्रकारच्या तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी रणनवरे बोलत होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन शिबिराचे प्रारंभ करण्यात आले. तर महात्मा फुले यांच्या जीवनावर व्याख्यान देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उडाणच्या अध्यक्षा आरती शिंदे, उमंग फाउंडेशनच्या वैशाली कुलकर्णी, रजनी ताठे, शाहीर कान्हू सुंबे, डॉ. संतोष गिऱ्हे, डॉ. धनाजी बनसोडे, नितीन डागवाले, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, किशोर डागवाडे, दत्ता जाधव, जालिंदर बोरुडे, दत्ता गाडळकर, ॲड. महेश शिंदे, ॲड. सुनिल तोडकर, युवा सेनेचे विक्रम राठोड, रवी सातपुते, अशोक कासार, पोपट बनकर, दिनेश शिंदे, सुनिल सकट, एड्स नियंत्रण सोसायटीचे समुपदेशक वाळू इदे, राहुल कडू, सागर फुलारी, अरबाज शेख, वैशाली कुलकर्णी आदी उपस्थित होते.
आरती शिंदे म्हणाल्या की, समाजसुधारकांचे स्मरण समाज उपयोगी उपक्रम राबवून केले पाहिजे. त्यांनी समाजासाठी केलेल्या योगदानाची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने सामाजिक कार्यात योगदान द्यावे. या उपक्रमास महिलांसह युवकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. शिबिरासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे विशाल गर्जे, ज्ञानेश्वर खुरांगे, भाऊराव वीर यांचे मार्गदर्शन लाभले.