विविध स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी केली धमाल
महिलांनी एकत्र येऊन सशक्त पिढी घडविण्यासाठी चालवलेली चळवळ दिशादर्शक -हेरंब कुलकर्णी
अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरातील सिताराम सारडा विद्यालयात मस्ती की पाठशाळा उपक्रम राबविण्यात आला. चार दिवसीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा पार पडल्या. या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी एकच धमाल केली.
या कार्यक्रमासाठी सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी, कवी सुभाष सोनवणे, देवकी खंडेलवाल, जया खंडेलवाल, नीलम खंडेलवाल, सारिका मुथा, लता खंडेलवाल, मंजू झालानी, सोनल लोढा, रेखा बंब, अंजली महाजन, ममता खंडेलवाल, बबिता खंडेलवाल, अर्चना कुलकर्णी, संतोष खंडेलवाल, तारा भुतडा, ज्योती गांधी, नयना भंडारी, मनिका ताथेड, सोनल जाखोटिया, राजश्री खंडेलवाल, शिल्पा पोरे, कल्पना खंडेलवाल, डिंपल शर्मा, श्रेया खंडेलवाल, राखी कोठारी, अनुजा जाधव, मंजू बुडवारिया, प्रिया गांधी, दिपाली कटारिया, शिल्पा संघवी, सीमा राजोरिया आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात जागृती ओबेरॉय यांनी सेवाप्रीत सशक्त पिढी घडविण्यासाठी विविध माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी कार्यकरत आहे. सामाजिक संवेदना जागृक ठेऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत देखील दिली जात असल्याचे स्पष्ट करुन, जीवनाची दिशा व ध्येय ठरवून त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
हेरंब कुलकर्णी यांनी शैक्षणिक क्षेत्रात सेवाप्रीतचे सेवाभावाने सुरु असलेले कार्य प्रेरणादायी आहे. महिलांनी एकत्र येऊन सशक्त पिढी घडविण्यासाठी चालवलेली चळवळ दिशादर्शक असल्याचे सांगितले. कवी सुभाष सोनवणे यांनी सेवाप्रीतच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करुन उपस्थितांची वाहवाह मिळवली. सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश दिला. चार दिवस शाळेत चित्रकला, नृत्य व फॅन्सी ड्रेस स्पर्धा रंगली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थितांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. अनुभा ॲबट व पायल जग्गी यांनी पाककला, सागर उकिर्डे यांनी चित्रकला, विक्टर सर यांनी नृत्य व निलम खंडेलवाल यांनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे परीक्षण केले. विविध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला. तर शालेय विद्यार्थ्यांना सेवाप्रीतच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.