वास्तूसंग्रहालय येथील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास अभिवादन
महिलांनी राजमाता जिजाऊंचा आदर्श समोर ठेवल्यास सक्षम भारताचा पाया रचला जाणार -मायाताई कोल्हे
अहमदनगर (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. भावी पिढी समोर महिलांनी राजमाता जिजाऊंचा आदर्श समोर ठेवल्यास सक्षम भारताचा पाया रचला जाणार असल्याचे प्रतिपादन यशवंती मराठा महिला मंडळाच्या संस्थापिका मायाताई कोल्हे पाटील यांनी केले.
यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. ऐतिहासिक वास्तूसंग्रहालय येथील राजमाता जिजाऊ व शहाजी राजे भोसले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी यशवंती मराठा महिला मंडळाच्या जिल्हाध्यक्षा गीतांजली काळे पाटील, शहराध्यक्ष मीराताई बारस्कर, माजी शहराध्यक्षा आशाताई शिंदे, कार्याध्यक्ष शीलाताई शिंदे, जिल्हा सचिव लिना नेटके, अनिता मोरे, ज्योती गंधाडे, भिंगारच्या अध्यक्षा कांता बोठे, उपाध्यक्षा मंगल काळे, मार्गदर्शक शोभा भालसिंग, सारिका खांदवे, अर्चना मोहिते आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गीतांजली काळे यांनी युवकांनी राजमाता जिजाऊंचा आदर्श समोर ठेऊन वाटचाल करावी व महिलांना सन्मानाची वागणुक देण्याचे आवाहन केले. मीराताई बारस्कर यांनी उपस्थित महिलांना राजमाता जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.