• Thu. Jun 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

कवयित्री सरोज आल्हाट यांच्या इंप्रिंट्स ऑफ नेचर ॲण्ड माय सोल या इंग्रजी काव्यसंग्रहाचे प्रकाशन

ByMirror

Nov 28, 2024
दि लेप्रसी मिशन ट्रस्ट इंडियाच्या दीडशे व्या वर्धापन दिनानिमित्त रंगला प्रकाशन सोहळा

दि लेप्रसी मिशन ट्रस्ट इंडियाच्या दीडशे व्या वर्धापन दिनानिमित्त रंगला प्रकाशन सोहळा

नगर (प्रतिनिधी)- येथील सुप्रसिद्ध कवियत्री, मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांच्या इंप्रिंट्स ऑफ नेचर ॲण्ड माय सोल या इंग्रजी काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. दि लेप्रसी मिशन ट्रस्ट इंडिया यांच्या दीडशे व्या वर्धापन दिनानिमित्त वोकेशनल ट्रेनिंग सेंटर नाशिक येथे आयोजित विशेष कार्यक्रमात सदर काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. शैला फ्रान्सिस व मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी बोलताना प्रा. शैला फ्रान्सिस यांनी सरोज आल्हाट यांच्या सामाजिक, साहित्यिक व एकूणच कार्याचा गौरव करताना त्यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्याचा मान मिळाल्याने संस्था कृतज्ञ असून, आल्हाट यांनी अनेक वर्षांपासून कुष्ठ बाधितांसाठी केलेले कार्य व मदत याबद्दल आभार व्यक्त केले.


दि लेप्रसी मिशन ट्रस्टचे 1874 पासून कुष्ठरुग्ण व समाजाप्रतीच्या अतुलनीय, निःस्वार्थ काम आणि वोकेशनल ट्रेनिंग सेंटर मार्फत बाधित लेकरांना स्वावलंबी बनविण्यासाठी दिले जाणारे मोफत तांत्रिक शिक्षण लक्षात घेता त्यांच्याप्रती स्नेह व आदर व्यक्त करण्यासाठी त्यांच्या समवेत पुस्तक प्रकाशन करण्यात आल्याचे कवयित्री सरोज आल्हाट यांनी सांगितले.
संस्थेच्या दीडशे वर्षाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना समर्पित दि पोएम ऑफ टी. एल. एम. टी.आय या विशेष कवितेचाही काव्यसंग्रहात समावेश आहे, जी सरोज आल्हाट वाचत असताना उपस्थित भावुक झाले होते. कवयित्री सरोज अल्हाट गेल्या 30 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक,साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, अनेक महत्त्वाची पदे सांभाळतानाच, असंख्य इंग्रजी व मराठी मासिकांचे संपादन तसेच त्यांचे लिखाणही प्रसिद्ध झाले आहे. त्यांना अनेक प्रतिष्ठित राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


त्यांच्या चार मराठी काव्यसंग्रहांप्रमाणेच इंग्रजी काव्यसंग्रहातील कविता ही तुल्यबळ, अत्यंत दर्जेदार, त्यांच्या खास शैलीतल्या, वाचकांना गर्भार्थामध्ये खिळून ठेवणाऱ्या अर्थपूर्ण असल्याचे प्रतिपादन प्रस्तावनाकार प्रा. प्रियदर्शन बंडेलू व इंग्रजी साहित्यातील विद्यावाचस्पती, पीएचडी प्रा. डॉक्टर संजीवनी भालसिंग मुळे यांनी केले असून, काव्यसंग्रहाला विख्यात चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ साजेसे आहे. नूतन काव्यसंग्रह प्रकाशनाबद्दल सरोज अल्हाट यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *