• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

महाशिवरात्रीनिमित्त तारकपूरला भाविकांना प्रसाद वाटप

ByMirror

Mar 8, 2024

गुरुनानक देवजी सेवा ग्रुपचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर येथे गुरुनानक देवजी सेवा ग्रुप (जी.एन.डी.) च्या वतीने महाशिवरात्री निमित्त भाविकांना खिचडीचे प्रसाद वाटप करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रसाद वाटपाला प्रारंभ करण्यात आले.

यावेळी जनक आहुजा, बाबा कर्नलसिंग, प्रा. माणिक विधाते, अजिंक्य बोरकर, संजय आहुजा, प्रदीप पंजाबी, अमोल गाडे, महेश मध्यान, जय रंगलानी, किशोर कंत्रोड, करन आहुजा, बबलू खोसला, विकी कंत्रोड, रामसिंग कथुरिया आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, गुरुनानक देवजी सेवा ग्रुप सेवाभावाने कार्य करत आहे. विविध सण-उत्सव काळात या ग्रुपच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. जनक आहुजा यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन रुनानक देवजी सेवा ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर सुरु असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला व सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *