• Sun. Jul 20th, 2025

प्रदीपकुमार जाधव यांचा समाज भूषण पुरस्काराने सन्मान

ByMirror

Feb 9, 2024

बीएसएनएलच्या मुख्य महाप्रबंधकांच्या हस्ते झाला सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- बीएसएनएल, शहर बँकेत सेवा देऊन फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडू घडविण्याचे कार्य करणारे प्रदीपकुमार शांतवन जाधव यांना सरस्वती घरडेआई फाऊंडेशनच्या (जि. अकोला) वतीने समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य बिएसएनएलचे मुख्य महाप्रबंधक प्रशांत पाटील यांच्या हस्ते जाधव यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गौतम घरडे मोठ्या उपस्थित होते.


प्रदीपकुमार शांतवन जाधव बीएसएनएल मध्ये कार्यरत असताना त्यांनी असोसिएशनच्या माध्यमातून कर्मचारी, अधिकारी वर्गाच्या न्याय, हक्काच्या मागण्यांसाठी पाठपुरावा केला. निस्वार्थ भावनेने असोसिएशन कडून कोणताही आर्थिक लाभ न घेता स्वखर्चाने महाराष्ट्रासह देशभरात दौरे केले. सेवानिवृत्तीप्रसंगी नूतन जिल्हा सचिवाला कोणताही पैसा खर्च न केलेले असोसिएशनचे पासबुक सुपुर्द केले.

शहर सहकारी बँकेचे संचालक म्हणून ते उत्कृष्ट कार्य करत आहे. तर अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सहसचिव म्हणून कार्य करताना त्यांनी अनेक खेळाडू घडवून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे. या कार्याची दखल घेऊन जाधव यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *