पोलीस दलातील प्रल्हाद गिते, माणिक चौधरी, शमुवेल गायकवाड व वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे यांना पुरस्कार जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे सोमवारी (दि.19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या चौथे राज्यस्तरीय काव्य संमेलनात उत्कृष्ट कार्य करणारे अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व सामाजिक क्षेत्रात विविध माध्यमातून निस्वार्थ योगदान देणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराने गौरव केला जाणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.
स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, शहर वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड यांचा विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तसेच सामाजिक वणीकरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे यांचा देखील पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
स्वागताध्यक्ष आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा रंगणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, काव्य संमेलनाचे अध्यक्ष रज्जाक शेख, कार्याध्यक्ष उद्योजक बाळासाहेब शहाणे उपस्थित राहणार आहेत.