शालिनीताई विखे पाटील यांच्या नावाने लावली 25 वटवृक्ष
माजी सैनिकांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनाने टाकलेले पाऊल क्रांतिकारक -सरपंच चारुदत्त वाघ
अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील डोंगररांगा, उजाड माळरान व पर्वतीय प्रदेशात सुरु असलेल्या वृक्षरोपण संवर्धनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हार घाटात (ता. पाथर्डी) वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या नावाने परिसरात 25 वट वृक्षांच्या झाडांची लागवड करण्यात आली.
या अभियानाप्रसंगी जवखेडेचे नवनिर्वाचित सरपंच चारुदत्त वाघ, चिचोंडीचे सरपंच श्रीकांत आटकर, ग्रामपंचायत सदस्य गोविंद मतकर, कोल्हारचे सरपंच राजू नेटके, ॲड. वैभव आंधळे, संजय जाधव, संदीप दानवे, निवृत्त मुख्याध्यापक महादेव पालवे, इब्राहिम शेख, देविदास तुपे, उद्योजक नामदेव नागरगोजे, वृक्षमित्र राधाकिसन भुतकर, वृक्षमित्र प्रविण सिंगवी, कोल्हारचे उपसरपंच गोरक्ष पालवे, माजी सरपंच बाबाजी पालवे, गौरव गर्जे, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, भाऊसाहेब पालवे, ईश्वर पालवे, किशोर पालवे, धर्मनाथ पालवे, बाजीराव गिते, दिनकर पालवे, गुरुजी नामदेव गिते, ईश्वर जावळे, भगवान पालवे, अप्पा गर्जे, रोहिदास पालवे, कैलास पालवे, मनसजन पालवे, सुनील पालवे, पोपट पालवे, अंबादास शिरसाठ, विक्रम डमाळे, चंदू नेटके, महादेव पालवे, शंकर बर्डे आदी उपस्थित होते.
सरपंच चारुदत्त वाघ म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी जय हिंद फाऊंडेशनचे वृक्षरोपण अभियान प्रेरणादायी आहे. माजी सैनिकांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनाने टाकलेले पाऊल क्रांतिकारक ठरत आहे. जिल्ह्यातील डोंगररांगा हिरवाईने फुलविण्याची लवकरच स्वप्नपूर्ती होणार असून, निसर्गाला पुनर्वैभव प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच श्रीकांत आटकर म्हणाले की, देशाच्या रक्षणाचे कर्तव्य बजावून, पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे आलेले माजी सैनिकांचे कार्य दिशादर्शक आहे. या समाजकार्यातून भावी पिढीचे उज्वल भवितव्य ठरणार असून, माजी सैनिकांच्या वृक्षरोपण चळवळीने निसर्ग पुन्हा बहरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी पालवे यांनी शालिनीताई विखे पाटील यांचे सर्वच क्षेत्रातीक कार्य वटवृक्षाप्रमाणे असून, त्यांच्या नावाने 25 वट वृक्ष लावण्यात आले आहे. तर लावलेल्या झाडाचे संवर्धन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आभार गौरव गर्जे यांनी मानले.