समता व बंधुत्वतेवर आधारलेल्या समाज निर्मितीसाठी बाबासाहेबांच्या विचाराचा जागर होणे गरजेचे -राहुल कांबळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. नगर-पुणे महामार्गावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उद्योजक सचिनशेठ कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेविका गौरीताई ननावरे, नगरसेविका लताताई शेळके, जालिंदर कोतकर, महेश गुंड, भूषण गुंड, विजय सातपुते, गणेश ननावरे, महेश सरोदे, सोनू घेंबुड, बापू सातपुते, संदीप पगारे, संजय कांबळे, अशोक कराळे, रवी गायकवाड, सचिन सरोदे, बाबा कोतकर, शशिकांत कांबळे, योगेश भालेराव, सुभाष कांबळे, अजय श्रीश्रीमाळ, सुनिल कांबळे, आदित्य कांबळे, संतोष साळवे, करण पाचारणे, अवी कांबळे, प्रथमेश कांबळे, केतन कांबळे, सुखदेव गुंड, विजय करांडे, हराळ, नरेश लगड, भरत काकडे, संतोष लोंढे आदींसह युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
नगरसेवक राहुल कांबळे म्हणाले की, हजारो वर्षापासून विषमता आणि अंधारात असलेल्या वंचित समाजाला बाबासाहेबांनी जागृक करुन त्यांचा उध्दार केला. बाबासाहेबांनी धम्मक्रांतीतून खरा माणुसकी धर्म शिकवला. धर्मातील भेदभाव, उच्चनिचता संपवून त्यांनी दीन-दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळवून दिला. समता व बंधुत्वतेवर आधारलेल्या समाज निर्मितीसाठी बाबासाहेबांच्या विचाराचा जागर होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.