• Sun. Jul 20th, 2025

सेवाप्रीतच्या वतीने हिवरेबाजारच्या जिल्हा परिषद शाळेस सीसीटिव्ही कॅमेरे भेट

ByMirror

Feb 26, 2024

पर्यावरण रक्षणासाठी सामाजिक क्षेत्रातील महिलांना देखील पुढाकार घ्यावा लागणार -पद्मश्री पोपट पवार

अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने आदर्श गाव हिवरेबाजार (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटिव्ही कॅमेर बसवून देण्यात आले.


सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी हिवरेबाजार गावाला भेट देऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पहाणी केली. शाळेची गरज ओळखून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने व त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी महिला सदस्यांनी हा उपक्रम राबविला.


आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपट पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बसवलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, प्रकल्प प्रमुख सविता चड्डा, गिता नय्यर, अर्चना खंडेलवाल, स्विटी पंजाबी, निशा धुप्पड, शोभाताई पवार, सरपंच विमलताई ठाणगे, मुख्याध्यापक बाबा जाधव, ग्रुपच्या सर्व सदस्या सविता चढ्ढा, रिटा सलुजा, डॉली मेहेता, अनिता शर्मा, बीना बत्रा, रंजना झिंजे, डॉली भाटिया, कीर्ती बोरा, करुना मुनोत, विजया सारडा, दीपा चंगेडिया, रिद्धी मनचंदा, कैलास मेहेता, उषा धवन, आंचल बिंद्रा, मंगला झंवर, सोनिया ॲबट, अन्नू ॲबट, रुपा पंजाबी, मंगला पिडीयार, अनिता गाडे, कंचन नेहालानी, शिल्पा गांधी, अर्पण बोथरा, योजना बोठे, चैताली बोराटे, सुनीता गांधी, शीतल मालू, मनीषा लोढा, गीता शर्मा, संगिता ओबेराय आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, सेवाप्रीत सातत्याने वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य करत आहे. समाजाचे देणे लागते या भावनेने महिलांनी पुढाकार घेऊन ही चळवळ सुरु केली आहे. हिवरेबाजारचे सर्वांनाच आकर्षण असून, या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या सोयीसाठी त्यांना सीसीटिव्ही कॅमेरे उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


प्रकल्प प्रमुख सविता चड्डा यांनी आजची मुले उद्याच्या उज्वल भविष्याची नांदी ठरणार आहे. त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सेवाप्रीतच्या सदस्या करत आहे. संपूर्ण शाळा सीसीटिव्ही कॅमेरेच्या निगरानीखाली आली असून, शिक्षकांना सर्व मुलांवर एकाचवेळी लक्ष देणे सहज शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


पद्मश्री पोपट पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी व भविष्यातील प्रश्‍नांचा वेध घेणारी शिक्षण पद्धतीचा अवलंब झाला पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटातून पृथ्वीचे असतित्व टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण व आरोग्याच्या प्रश्‍नावर शिक्षण देऊन संस्कारमय पर्यावरणवादी भावी पिढी घडवावी लागणार आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना देखील या प्रश्‍नावर काम करावे लागणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. शोभाताई पवार यांच्या माध्यमातून सेवाप्रीतच्या सदस्यांनी हा उपक्रम घडवून आणला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *