पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा फुले व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन
महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना गुरुस्थानी माणून त्यांचा इतिहास जगा समोर आनला -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा शिवसन्मान सोहळा फुले ब्रिगेडच्या वतीने माळीवाडा येथे पार पडला. महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर, राष्ट्रवादीचे प्रा. माणिक विधाते, किरण जावके, विकास खेडकर, गोविंद कराड, ब्रिगेश ताठे, विक्रम बोरुडे, रेणुकाताई पुंड, संतोष हजारे, स्वप्निल पडोळे, विश्वास शिंदे, पांडुरंग ढाकणे, किरण मेहेत्रे, भाऊ पुंड, पप्पू बनकर, महेश गाडे, सनी दळवी, अतुल पाटोळे, राजेश मोरे, अनुराग पाटोळे, गौरव बोरुडे, संतोष बोरुडे, महेश सुडके, विशाल सुडके, किरण पंधाडे, प्रकाश शिंदे, ओंकार गायकवाड, जालिंदर बोरुडे, ऋषी ताठे, संकेत लोंढे, किरण पंधाडे, गणेश जाधव, प्रसाद बनकर आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. संग्राम जगताप म्हणाले की, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी माणून त्यांचा इतिहास जगा समोर आनला. महाराजांवर कुळवाडी भूषण पोवाडा त्यांनी लिहिला. तर पहिली शिवजयंती उत्सव साजरा करुन खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या मना-मनात रुजण्याचे काम त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास नेहमीच समाजाला प्रेरणादायी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दीपक खेडकर म्हणाले की, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा शिवसन्मान सोहळा गेल्या दहा वर्षांपासून मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना गुरु माणून त्यांचे कार्य पुढे नेले. त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पहिला कुळवाडी भूषण हा एक हजार ओळींचा पोवाडा सादर करुन त्यांचे महान कार्य जगासमोर ठेवले. आजही समाजात महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करुन त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. फुले ब्रिगेडच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचाराने समाजातील वंचित घटकांसाठी कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते यांनी इतिहास, परंपरा व संस्कृतीचा वारसा प्रत्येकाने जोपासून पारंपारिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे स्पष्ट केले.