बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तातडीने प्रत्यक्ष काम सुरु करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर तातडीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे प्रत्यक्ष काम सुरु करण्याची मागणी करण्यात आली.
अभिवादनासाठी बसपाचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे, विधानसभा प्रभारी गणेश बागल, शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, महिला शहराध्यक्षा अंजुम सय्यद, माजी शहराध्यक्ष संतोष जाधव, विधानसभा कोषाध्यक्ष बाळू काते, अतुल काते, पंकज गायकवाड, फ्रान्सिस पाटोळे, रामदास खरात, संदेश भाकरे, राहुल जाधव, रूपालीताई भाकरे, राहुल कोकरे, शुभम गायकवाड, राजू गुजर, अमृता साळवे, शिंदे पेंटर, दीपक पवार, नंदू भिंगारदिवे, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ गायकवाड, राम गायकवाड, प्रथमेश घाटविसावे, शहानवाज शेख आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेउपस्थित होते.
उमाशंकर यादव म्हणाले की, दीन-दलितांना न्याय, हक्क मिळवून देऊन, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेबांनी आपले जीवन वाहिले. त्यांचे कार्य सर्व समाजाला दिशा देणारे आहे. तर त्यांच्या पूर्णाकृती पुतळा त्यांच्या विचारांनी कार्य करण्यासाठी प्रेरक ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटनाचे फार्स न करता प्रत्यक्ष काम सुरु व्हावे, अशी आंबेडकरी जनतेची मागणी आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे प्रत्यक्ष काम सुरु न झाल्यास बसपाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.