• Sun. Jul 20th, 2025

ओम काळे यांचा महाराष्ट्र आयकॉन पुरस्काराने गौरव

ByMirror

Mar 4, 2024

कामगारांच्या न्याय, हक्कासाठी केलेल्या कार्याचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगार चळवळीत सक्रीय योगदान देवून कामगारांच्या न्याय, हक्कासाठी कार्य करणारे धडक जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ओम काळे यांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


पुणे येथे कॅन्सर पीडित लहान मुले, अंध-अपंग व गरजू महिलांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या एक हाथ मदतीचा कार्यक्रमात काळे यांना अभिनेते देव झुंबरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मॉडेल फोटोग्राफर गणेश गुरव, सचिन दानााई, अभिनेत्री सोनाली खनखारे, सत्यशोधकचे बाळासाहेब बनगर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


ओम काळे यांचे कामगार चळवळीत सातत्याने योगदान देत आहेत. धडक जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामगारांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे. संघटित व असंघटित कामगारांसाठी सुरु असलेल्या कार्याची दखल घेवून काळे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गणेश गुरव, धीरज कांबळे, मेजर तुकाराम डफळ, रावसाहेब काळे, युवा उद्योजक विनोद साळवे, बाबुराव चौधरी, सुरेश काळे, संतोष काळे, सुनीता तेली, दिपक तेली, आदिनाथ अनारसे, कमल घायावळ, अभिनेते अजिंक्य गायकवाड, आदित्य राजे मराठे, अभिनेत्री गायत्री लहामगे, अरुण वडगुडळे, अंकुश काळे, अजय स्वामी, ॲड. सुमेध डोंगरे आदी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल काळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *