सामाजिक कार्यातून डोंगरे यांनी गावचे नाव उंचावले -सुरेश जाधव
नगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीचा महात्मा ज्योतीबा फुले फेलोशिप नॅशनल अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचा निमगाव वाघा (ता. नगर) येथे सत्कार करण्यात आला.
बिरोबा देवस्थानचे भगत नामदेव भुसारे, अहमदनगर शोतोकान कराटे डू असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक सुरेश जाधव व मयुर काळे यांनी पै. डोंगरे यांचा सत्कार केला. यावेळी मंदा साळवे, प्रमोद थिटे, अमोल वाबळे, मयुरी जाधव, अपूर्वा कापसे, समर्थ जाधव, संग्राम जाधव, सार्थक जाधव, शिवम शिंदे, सोहम जाधव, तनुजा जाधव, रासकर आदी उपस्थित होते.
सुरेश जाधव म्हणाले की, समाजासाठी निस्वार्थपणे सुरु असलेले डोंगरे यांचे कार्य अभिमानास्पद आहे. गाव पातळीवर खेळाडू घडविण्याचे ते सातत्याने योगदान देत आहे. सेवा कार्यातून डोंगरे यांनी गावचे नाव उंचावले असून, विविध क्षेत्रात त्यांना मिळालेला पुरस्कार हे गावासाठी भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, ग्रामस्थांच्या सहकार्याने सामाजिक कार्य सुरु आहे. पाठीवरती दिलेली कौतुकाची थाप आनखी समाजकार्य करण्यास बळ देणारी आहे. गावातील राजकारण बाजूला ठेऊन समाजकारण हेच प्रमुख ध्येय समोर ठेऊन कार्य सुरु आहे. लवकरच गावात सर्वसामान्य खेळाडूंसाठी कुस्ती संकुल उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
