• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहर बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल निखील नहार यांचा सत्कार

ByMirror

Dec 15, 2024
शहर बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल निखील नहार यांचा सत्कार

नहार यांची झालेली निवड हरदिनच्या दृष्टीने अभिमानास्पद -संजय सपकाळ

नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य निखील नहार यांची शहर सहकारी बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. भिंगार येथील जॉगिंग पार्कमध्ये झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, दिलीप गुगळे, दीपक धाडगे, अभिजीत सपकाळ, सुभाष पेंढुरकर, अनिलराव सोळसे, रतन मेहत्रे, सुधीर कपाळे, अजय खंडागळे, भास्करराव भालेराव, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर अनावडे महाराज, अशोक पराते, प्रकाश देवळालीकर, अविनाश जाधव, जालिंदर बेरड, संतोष लुनिया, रमेश कोठारी, सखाराम अळकुटे, राजू कांबळे, विकास निमसे, अविनाश पोतदार, किरण फुलारी, सूर्यकांत कटोरे, शेषराव पालवे, नामदेव जावळे, अनंत सदलापूरकर, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, सुंदरराव पाटील, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे, किशोर भगवाने, संजय भिंगारदिवे, योगेश चौधरी, अशोक भगवाने, महेश सरोदे, जहीर सय्यद, दीपक अमृत आदी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, शहर सहकारी बँकेची शहराच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. या बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी ग्रुपचे सदस्य असलेले नहार यांची झालेली निवड ही सर्व सदस्यांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांचा सहकार व बँकिंग क्षेत्रातील अभ्यास बँकेला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार असल्याची भावना व्यक्त करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.


सत्काराला उत्तर देताना निखील नहार म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुप एका कुटुंबाप्रमाणे आरोग्य व पर्यावरण चळवळ चालवत आहे. निस्वार्थ भावनेने संघटनेचे सदस्य योगदान देत आहे. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती या ग्रुपशी जोडला गेलेला आहे. बँकेच्या माध्यमातून देखील सामाजिक चळवळीत योगदान देण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले. तर बँकेच्या सभासदांचे हित साधून सर्व संचालक मंडळाच्या प्रयत्नाने बँकेची प्रगती साधली जाणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *