• Mon. Jul 21st, 2025

इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये नवीन ह्युंदाई क्रेटाचे अनावरण

ByMirror

Jan 19, 2024

अहमदनगर (प्रतिनिधी)- मास मार्केट ब्रॅण्ड दरम्यान विक्री पश्‍चात सेवा सर्व्हिसमध्ये ग्राहकांची प्रथम पसंती मिळवणाऱ्या ह्युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी ह्युंदाई येथे दी ऑल न्यू ह्युंदाई क्रेटाचे अनावरण आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक विजयकुमार गडाख, जनरल मॅनेजर राजू बेजगमवार, सेल्स मॅनेजर अजय मगर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


दी ऑल न्यू ह्युंदाई क्रेटा या नवीन वाहनाच्या सेगमेंट मध्ये वाजवी दरात उत्कृष्ट सुविधांचा लाभ मिळणार आहे. ज्या सुविधा इतर स्पर्धक कंपन्यांच्या गाड्यांमध्ये उपलब्ध नाहीत.


17 प्लस ॲडव्हान्स सेफ्टी फिचर, 36 सँडर्स ॲडव्हान्स फिचर, ह्युंदाई स्मार्ट सेन्स (एडीएएस लेवल 2), टायर प्रेशर मनिटरिंग सिस्टिम हायलिंग्स, ॲडव्हान्स ॲण्ड हायस्ट सेन्ट बॉडी स्ट्रक्चर डिझाईन, 26.03 सिमी एसडी ऑडिओ, व्हिडिओ नेव्हिगेशन सिस्टीम, स्मार्ट पॅरामनिक सन रूफ, ऑल न्यू हॅरीजेंटल डॅशबोर्ड, 360 डिग्री ॲडव्हान्स ब्लू लिंक 17 प्लस फिचर्स, 4 सिलेंडर इंजिन/डिझेल 1.5/पेट्रोल, 1.5/पेट्रोल टर्बो इंजिन सहित, 3 वर्षे /1 लाख कि.मी. ची वॉरंटी (जे अगोदर पूर्ण होईल ते लागू राहील), 3 वर्षे फ्री रोड असिस्टंट, लो कॉस्ट ऑफ मेन्टेनन्स, सहा एअर बॅगचा समावेश आहे.


सदर गाडीमध्ये 1.5 डिझेल/1.5 पेट्रोल/ टर्बो वाईड चॉईस ऑफ ट्रान्समिशन मॅन्युअल, ऑटोमॅटिक आयव्हीटी व 7 स्पीड डीसीटी ट्रान्समिशनसह इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. सदर गाडी पेट्रोल मध्ये 17 व्हेरिएन्ट व डिझेलमध्ये 11 व्हेरिएन्ट उपलब्ध असून, तसेच सात आकर्षक रंगात उपलब्ध होणार आहे. सदर पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएन्ट गाडीची एक्स शोरूम किंमत 10.99 ते 19.99 लाख दरम्यान राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


नामवंत बँका व फायनान्स कंपन्यांकडून झिरो प्रोसेसिंग फी 100 टक्के ऑन रोड फायनान्स सुविधा उपलब्ध आहे. ह्युंदाई प्रॉमिसच्या माध्यमातून ग्राहकांना जुन्या गाडीची एक्सचेंज सुविधा देण्यात आलेली आहे. दररोज ग्राहकांची बुकिंग साठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सदर वाहन ईलाक्षी ह्युंदाई मध्ये डेमो व टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांनी अधिक माहितीसाठी शोरूमला भेट देऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन ईलाक्षी ह्युंदाईचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *