पै. महेश लोंढे मित्र मंडळ व लोंढे परिवाराचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या सद्गुरु नवनाथ चरित्र कथा सप्ताह भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कथेप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमाचा व भंडाऱ्याचा भाविकांनी लाभ घेतला. कै.रावसाहेब केरुजी लोंढे व कै.पै. सोमनाथ सोपानराव लोंढे यांच्या स्मरणार्थ नेप्ती नाका येथील श्री मार्कंडेय संकुलात हा धार्मिक सोहळा पार पडला. श्रावण मासचे औचित्य साधून पै. महेश लोंढे मित्र मंडळ व समस्त लोंढे परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.
या कथा सप्ताहात सकाळ व संध्याकाळी सामुदायिक पारायण, महाआरती व सद्गुरु नवनाथ चरित्र कथा रंगली होती. मच्छिंद्रनाथ चौकटे यांनी आपल्या वाणीतून सद्गुरु नवनाथ चरित्र कथेचा उलगडा करुन, नवनाथांचे अद्भुत चरित्र वर्णिले. उपस्थित भाविक या भक्तिरसाचे अक्षरश: बुडाले.
माजी नगरसेवक संभाजी लोंढे, सुभाष लोंढे, रामभाऊ लोंढे, श्यामभाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा पार पडला. यावेळी दत्ताराम चौकटे, गोरक्षनाथ चौकटे, शुभम पाचरणे, सागर चव्हाण, ओमकार काळे, श्लोक दिकोंडा, किशोर जाधव, ऋषिकेश बोज्जा, ओम जाधव, अमित नाळके, सचिन श्रीराम आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
